जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
रेल्वे सेवा

नाशिक रेल्वे भूसंपादनासाठी योग्य मोबदला द्या-…यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या शिर्डी-पोहेगाव-नाशिक रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन व मालमत्तेचा जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी एका बैठकीत नुकतीच केली आहे.

शिर्डी-नाशिक या नूतन रेल्वे मार्गबाबत आ.काळे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसमवेत रेल्वे अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली तो क्षण.

“या शिर्डी-नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्गातून 
अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जात आहे.त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करतांना प्रत्यक्ष शेतीचा वापर,सिंचनाची उपलब्धता,पिकांची उत्पादकता,फळबागा व इतर संबंधित बाबींचा विचार करून बागायती जमिनीप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला निश्चित करण्यात यावा.प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन भाग होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे, ट्रॅक्टर,शेतीची यंत्रसामग्री,ऊस वाहतूक व इतर शेतीविषयक कामांसाठी गंभीर अडचणी निर्माण होतील.त्यामुळे रेल्वे मार्गाच्या उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूंना आवश्यक त्या ठिकाणी रुंद,कायमस्वरूपी,पक्के डांबरी किंवा सिमेंट काँक्रीटचे शेतरस्ते निर्माण करावे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

  केंद्र सरकारने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलून तो अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे नेण्यास मंजुरी दिली असून,नाशिक-शिर्डी नवीन दुहेरी रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे.हा रेल्वेमार्ग आता पुणे ते नाशिक दरम्यान अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे धावणार आहे.या नवीन प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ८ हजार ९७० कोटी रुपये आहे.या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटन वाढणार असून शिर्डी थेट नाशिक आणि पुणा शहराशी जोडली जाणार आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसमवेत रेल्वे अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

नूतन रेल्वे मार्ग.

   सदर प्रसंगी भूमी अभिलेख विभागाचे शेखर कोकरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण,राहुल रोहमारे,गंगाधर औताडे,माजी संचालक सचिन रोहमारे,सोपान गुडघे,रामनाथ घारे,गोपीनाथ रहाणे,वाल्मीक नवले,नंदकिशोर औताडे,अण्णासाहेब पाचोरे,देवराम पाचोरे आदीसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतात जाण्यासाठी रस्त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही याची काळजी घ्या. शिर्डी-पोहेगाव-नाशिक रेल्वे मार्गासाठी मालमता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे,पोहेगाव, सोनेवाडी,जवळके,शहापूर,बहादराबाद, बहादरपूर,धोंडेवाडी आदी गावातील प्रकल्पबाधित शेतकरी,नागरीक आदींची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.या भागातून अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला जात आहे.त्यामुळे जमिनीचे मूल्यांकन करतांना प्रत्यक्ष शेतीचा वापर,सिंचनाची उपलब्धता,पिकांची उत्पादकता,फळबागा व इतर संबंधित बाबींचा विचार करून बागायती जमिनीप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला निश्चित करण्यात यावा.प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन भाग होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे, ट्रॅक्टर,शेतीची यंत्रसामग्री,ऊस वाहतूक व इतर शेतीविषयक कामांसाठी गंभीर अडचणी निर्माण होतील.त्यामुळे रेल्वे मार्गाच्या उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूंना आवश्यक त्या ठिकाणी रुंद,कायमस्वरूपी,पक्के डांबरी किंवा सिमेंट काँक्रीटचे शेतरस्ते निर्माण करावेत.रेल्वे मार्गामुळे पावसाळ्यात शेतातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडल्यास शेतीमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होणार नाही यासाठी रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना योग्य आकाराचे पाण्याचे चर,नाले,कल्व्हर्ट,क्रॉस-ड्रेनेज व आवश्यक जलनिस्सारण व्यवस्था करा.रेल्वे मार्गामुळे विद्यमान शेतीपंप,विद्युत वाहिन्या व वीज जोडण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे मार्गाच्या उत्तर बाजूची व दक्षिण बाजूची शेती लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी स्वतंत्र वीज व्यवस्था विद्युत खांब, केबल व जोडणीची सुविधा निर्माण करावी असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close