कोपरगाव तालुका
…या गावात पाण्यात बुडून तरुणांचा अंत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु असून त्यांनी उकरलेल्या खड्यात साठलेले पाणी होते त्या खड्यात अंघोळीला गेलेला तरुण सचिन भाऊसाहेब पवार (वय-२२) याचा करून अंत झाला आहे त्याच्या निधनाने चांदेकसारे गावात शोककळा पसरली आहे.
या बाबत या तरुणांचे चुलते द्वारकानाथ नामदेव पवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.हा तरुण व त्याची आई हे धुणे धुण्यासाठी या खड्ड्याकडे गेले होते. मात्र त्याच्या आईचे काम आटोपल्यावर ती निघून गेल्यावर तो पोहण्यास त्या खड्यात उतरला असता हि दुर्घटना घडली आहे.उशीर होऊनही आपला मुलगा घरी का आला नाही याची चौकशी केली असता हि दुर्घटना उघड झाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी या तरुणांची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री बाबर हे करीत आहे.