जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विमानतळासाठी जमिनीसाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील विमानतळाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून जमिनीची गरजही वाढत आहे,त्या साठी आवश्यक जमिनी शासनाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन खरेदी कराव्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेवून केली आहे.


त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील शिर्डी विमानतळाचा विस्तार होत असतांना या विस्तारासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता भासणार आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जातील त्यावेळी या जमिनी भु-संपादनाच्या नवीन कायद्यानुसार खरेदी करून जमीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा व त्याचबरोबर देण्यात येणारी आश्वासने देखील तातडीने पूर्ण करावी. विमानतळासाठी जमिनी खरेदी करतांना त्यावेळी शेतकऱ्यांना व काकडी ग्रामस्थांना दिलेली काही आश्वासने आजपर्यंत विमान प्राधिकरणाकडून पूर्ण झालेली नाही शिवाय अल्पावधीतच या भागातील शेतकऱ्यांना निळवंडेचे पाणी येणार आहे.याकडे आ.काळे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून काकडी गावात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले असून विमान तळाच्या विस्तारासाठी जमिनी खरेदी करतांना या जमिनी नवीन भु संपादन कायद्यानुसार खरेदी करून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यानी दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close