जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

रेल्वे इंजिनच्या धडकेत ४९ मेंढ्या ठार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

वाकडी-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील वाकड़ी-श्रीरामपुर रस्त्यालगत असलेल्या दौंड-मनमाड या रेल्वे मार्गावरील चौकीगेट क्रमांक ५२ यशवंत बाबा चौकी येथील भुयारी मार्गावर सुमारे चार ते पाच फुट खोल पावसाचे पाणी साचल्याने सुमारे ४५ ते ५० मेंढ्या रेल्वे मार्गावर घेऊन जात असताना त्यांना रेल्वे इंजिनाने जोराची धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.त्या मुळे या रेल्वे मार्गावर मांसाचा चिखल झालेला झालेला आढळून आला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी भुयारी मार्ग करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला होता.बऱ्याच ठिकाणी हे भूमिगत पूल बांधून पूर्ण झाले आहे.मात्र त्या भुयारी मार्गावरील पुलाखालील पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही परिणामी भर पावसात आलेल्या पाण्यामुळे त्या भुयारी पुलाखाली मोठ्या प्रमाणावर मोठ्या खोलीचे पाणी साठले जाते व त्याचा निचरा होण्यास अद्याप तरी सुविधा नसल्याने त्या ठिकाणी प्रवासी,व वाहन धारक आपली वाहने नेण्यास धजत नाही.तीच अवस्था पाळीव प्राण्यांची होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी भुयारी मार्ग करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला होता.बऱ्याच ठिकाणी हे भूमिगत पूल बांधून पूर्ण झाले आहे.मात्र त्या भुयारी मार्गावरील पुलाखालील पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही परिणामी भर पावसात आलेल्या पाण्यामुळे त्या भुयारी पुलाखाली मोठ्या प्रमाणावर मोठ्या खोलीचे पाणी साठले जाते व त्याचा निचरा होण्यास अद्याप तरी सुविधा नसल्याने त्या ठिकाणी प्रवासी,व वाहन धारक आपली वाहने नेण्यास धजत नाही.तीच अवस्था पाळीव प्राण्यांची होत आहे.त्यांना या खोल वाटणाऱ्या पाण्यातून जाण्याऐवजी ते थेट धोका पत्करून रेल्वे रुळावरून जाण्याचे धाडस करत आहे.व परिणामी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे हे दुर्दवी अपघात होताना दिसत आहे.त्याचेच प्रत्यन्तर वाकडी नजीक वाकडी-श्रीरामपूर या मार्गावर घडले असून या ठिकाणी पुलाखालील पाण्याच्या भीतीने या मेंढ्या मेंढ्या मालकाने रेल्वे पुलावरून नेत असताना नेमक्या वेळेला भरधाव वेगाने रेल्वे इंजिन आले व त्याने या सर्व रूळ ओलांडत असलेल्या मेंढ्या जोराची धडकेने चिरडल्या आहेत.यात या मेंढ्या मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या दुर्घटनेत या मेंढ्यांचा मांसाचा रेल्वे मार्गावर जवळपास पन्नास ते शंभर फुटापर्यंत चिखल झालेला आढळून आला आहे.त्या मुळे या मेंढपाळाला आपले तोंड बडवून घेण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.हि घटना काल सायंकाळी घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान या मृत मेंढ्या व जीवित मेंढ्या काही अज्ञात इसमानी आपल्या स्वार्थासाठी उचलून नेल्याची संतापजनक घटना ही उघडकीस आली आहे.या दुर्घटनेत नेमक्या किती मेंढ्या होत्या हा आकडा समजू शकला नाही.हा मेंढपाळ नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील असल्याची माहिती समजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close