जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या पतसंस्थेत भोंदू खरातच्या घरातील खाते उघड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याने कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्थेत जवळपास स्वतःचे त्याच्या पत्नीचे आणि त्याचा मुलगा आणि मुलगी असे चार खाते असून त्याचे अन्य घरातील नातेवाईक वारस असलेल्या खात्यांची संख्या 70-72 असल्याचे तर स्वतः 47 खात्यांना वारस असल्याची माहिती समता सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

समता सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना.

 

“भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरणाबाबत बोलायचे तर त्याचे जवळचे नातेवाईक वारसदार असलेले जवळपास 70-72 खाते असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.शिवाय तो स्वतः 47 खात्यांना वारसदार असून एकूण तो 119 खात्यांना वारसदार आहे.त्याने आमच्या पतसंस्थेत सन-2021 साली खाते उघडले होते.त्याचे गेल्या पाच वर्षात जवळपास 100 कोटी नव्हे तर 15 कोटी रुपयांचे व्यवहार केलेले आहे”-संदीप कोयटे,संचालक,समता सहकारी पतसंस्था,कोपरगाव.

   महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे नवनवे कारनामे समोर येत असून आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहे.त्याने अनेक नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती वापरून खरातने कोपरगाव नगरीत मोठ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे उभे केल्याचा संशय एस.आय.टी.ला आहे.त्यात कोपरगाव येथील अकराशे कोटींच्या ठेवीचा दावा करणाऱ्या माध्यमांत आघाडीच्या समता सहकारी पतसंस्थेचे नाव समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.त्यात रुपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचे नावाने एक खाते असून त्यात हा भोंदूबाबा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून व्यवहार करत असल्याच्या बातम्या दूरचित्रवाणीवर काल दिवसभर सुरू होत्या.त्यामुळे कोपारगावसह उत्तर नगर जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.त्याबाबत आज सकाळी समता सहकारी पतसंस्थेत आज सकाळी 10 वाजता काल पावसामुळे स्थगित झालेल्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भोंदू अशोक खरात याचे आमच्या सहकारी पतसंस्थेत त्याचे स्वतःचे त्याच्या पत्नीचे आणि त्याचा एक मुलगा एक मुलगी असे चार खाते आहे.खातेदाराने आपल्या खात्याला वारसदार कोण लावायचा हा सर्वस्वी खातेदार यांचा हक्क असल्याचे त्याने कोण वारस लावायचा हे आम्ही सांगू शकत नाही.संस्थेत जवळपास 01 ते सव्वा लाख खातेदार आहे.त्यामुळे कोण कुठे खाते उघडतो यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही आणि खातेदाराला खाते उघडण्यापासून रोखू शकत नाही.खरात याचे प्रकरणाबाबत बोलायचे तर त्याचे जवळचे नातेवाईक वारसदार असलेले जवळपास 70-72 खाते असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.शिवाय तो स्वतः 47खात्यांना वारसदार असून एकूण तो 119 खात्यांना वारसदार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.त्याने आमच्या पतसंस्थेत सन-2021 साली खाते उघडले होते.त्याचे गेल्या पाच वर्षात जवळपास 100 कोटी नव्हे तर 15 कोटी रुपयांचे व्यवहार केलेले आहे.त्याने सर्व खात्यांना के.वाय.सी.जोडलेली असून कार्यदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.त्यामुळे कोणीही खातेदार संस्थेत आला तर त्याला खाते उघडण्यास नाही म्हणता येत नाही.त्याने सर्व कायदेशीर पूर्तता केली तर तर ते संस्थेचे कर्तव्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.या सर्व खात्यांची कायदेशीर तज्ञांकडून आम्ही तपासणी करून घेतली आहे.संबंधित पोलिस विभागाचे आलेल्या तपासी अधिकाऱ्यांना सर्व माहिती सुपूर्त केली आहे.त्यामुळे माध्यमांनी अफवा पसरवू नये व ठेवीदार आणि सभासदांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन संदीप कोयटे यांनी शेवटी केले  आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close