जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरात भूमिपूजन,दोन गटात वादंग,आरोप प्रत्यारोप सुरू !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.२ मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत इस्कॉनच्या खुल्या जागेतील संरक्षण भिंत्तीचे कामासाठी रक्कम रु.२२ लक्ष ८ हजाराचा निधी प्रशासन काळात आ.काळे यांनी मंजूर केला होता.परंतु काल रविवार सुट्टीचे दिवशी अनाधिकृतरित्या नगरपरिषदेचे कोणी अधिकारी नसतांना शिष्टाचार सोडून भूमिपूजन करण्यात आले ते निषेधार्ह असून ते तातडीने नगरसेवक याचे हस्ते करण्यात यावे अशी मागणी त्या प्रभागातील नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांचेकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

भूमिपूजनाची विरोधी तक्रार करताना राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर,रमेश गवळी,शैलेश साबळे,महमूद सय्यद आदी निवेदन देऊन बाहेर आले तो क्षण.

“काल शैलेश साबळे आणि त्यांच्या धर्मपत्नी स्मिता शैलेश साबळे यांनी रेणुका कोल्हे यांनी केलेल्या भूमिपूजनाला हजेरी लावली असून आज ते पुन्हा निषेध व्यक्त करायला आणि निवेदन द्यायला येत असल्याचा आरोप करून ही राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका आहे,त्यामुळे राष्ट्रवादीतील बहुरूपे कोण याची शहरात चर्चा सुरू झाली आहे”-प्रसाद आढाव,गटनेते,भाजप कोल्हे गट,कोपरगाव नगरपरिषद.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”काल कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक २ मधील या कामासाठी सुमारे २२ लाख ८ हजार २५४ रुपये इतका अंदाजित निधी मंजूर करण्यात आला असल्याचा दावा करून त्या कामाचे भूमिपूजन माजी आ.कोल्हे गटाच्या रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते.त्यावरून आ.काळे आणि माजी आ.कोल्हे यांचे दोन गटात वादंग निर्माण झाले असून आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला असून मुख्याधिकारी सुहास जगताप यांचेकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे त्यात ही मागणी करून सत्ताधारी कोल्हे गटावर वरील आरोप केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवक निवेदन देऊन बाहेर आल्यावर त्यांना भाजपचे गटनेते प्रसाद आढाव यांनी त्यांच्या साबळे यांच्या कालच्या उपस्थिती बाबत घेरले तो क्षण.
   राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सदर  निधी आ.आशुतोष काळे मिळवून दिला असताना असताना त्याचे भूमिपूजन रेणुका कोल्हे यांनी परस्पर कसे होते असा जाबसाल केला आहे व मुख्याधिकारी जगताप हजर नसल्याने त्यांनी उपमुख्यधिकारी मनोजकुमार पापडेजा यांच्याकडे आपले निवेदन सुपूर्त केले आहे.व प्रशासनाच्या या गलथानपणाला बोल लावले आहे.व अशा घटना पुन्हा घडून देऊ नये अशी मागणी केली आहे.

   सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी गटनेते वीरेन बोरावके,माजी नगरसेवक मंदार पहाडे,नगरसेवक महमूद सय्यद,जनार्दन कदम,मनोज नरोडे,बाळासाहेब रिकामशैलेश साबळे,माजी नगरसेवक रमेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

काल कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक २ मधील संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करताना रेणुका कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश साबळे त्यांच्या धर्मपत्नी नगरसेविका स्मिता साबळे दिसत असल्याने त्यांच्या उलट सुलट उपस्थितीने राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांत गोंधळ उडाला आहे ते छायाचित्र.

  दरम्यान याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवक यांनी मुख्याधिकारी जगताप हजर नसल्याने त्यांनी उपमुख्यधिकारी मनोजकुमार पापडेजा यांच्याकडे आपले निवेदन सुपूर्त केले आहे.व प्रशासनाच्या या गलथानपणाला बोल लावले आहे.व अशा घटना पुन्हा घडून देऊ नये अशी मागणी केली आहे.

   दरम्यान निवेदन देऊन बाहेर आल्यावर त्यांना भाजपचे गटनेते प्रसाद आढाव यांनी घेरले होते त्यांनी त्यांना जाबसाल विचारला असून त्यांनी तुमचे नगरसेवक उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केले आहे.आणि आता आज त्यावर आक्षेप घेणे चुकीचे असल्याचा दावा केला आहे.

   दरम्यान त्या ठिकाणी गर्दी झालेली पाहून शिवसेनेचे नगरसेवक अनिल आव्हाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हा काय प्रकार आहे याचा शोध घेतला असता त्यात आमच्या महायुतीच्या माणसाला घेरले की काय ? याची शंका आल्याने आपण धावत आलो असल्याचा दावा केला आहे.मात्र त्याचा शेवट हास्यविनोदात झाल्याने वातावरण हलकेफुलके होण्यास मदत मिळाली असल्याचे दिसून आले आहे. 

   दरम्यान या प्रकरणी भाजपचे गटनेते प्रसाद आढाव यांनी राष्ट्रवादीच्या या दुटप्पीपणावर प्रहार केला असून,”काल शैलेश साबळे आणि त्यांच्या धर्मपत्नी स्मिता शैलेश साबळे यांनी भूमिपूजनाला हजेरी लावली असून आज ते पुन्हा निषेध व्यक्त करायला आणि निवेदन द्यायला येत असल्याचा आरोप करून ही राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका असल्या” चा आरोप केला आहे.त्यामुळे शहरात राष्ट्रवादीचे बहुरूपे असल्याच्या उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close