जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन गटात हाणामारीत सभापती महिलेच्या पतीला मारहाण,गुन्हा नाही !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवातून मनात राग धरून काल सायंकाळी ईशान्यगड आणि पश्चिम गडातील दोन गटात तात्कालिक राग मनात धरून बैल बाजार रोडवर काल सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत विद्यमान सत्ताधारी गटातील विषय समितीच्या सभापती महिलेच्या पतीला दुसऱ्या गटाने लोखंडी गजाने जोरदार  मारहाण केली असल्याची बातमी हाती आली असून त्याला पोलिसांनी आणि तेथे उपस्थिती कार्यकर्त्यांनी आणि सत्ताधारी गटांच्या गटनेत्याने दुजोरा दिला आहे.मात्र त्यांनी तो किरकोळ वाद असल्याचे समर्थन केले आहे.दरम्यान उपचार केल्यानंतर आपण गुन्हा दाखल करू” असे म्हणून सभापती महिलेच्या पतीने वेळ निभावून नेली असल्याची बातमी हाती आली आहे.

 

दरम्यान एका माहितीनुसार फिरोज पठाण यांचे पुतणे यांचा होलसेल चॉकलेट,बिस्कीट,कुरकुरे आदी विक्री करण्याचा व्यवसाय असून तो उधारी मागण्यास गेला होता.त्यात तो 750  मागत होता तर समोर किराणा दुकानदार असलेली कुरेशी नामक महिला 700 रूपये उधारी असल्याचा दावा करत होती.त्यावरून दोघांत वाद निर्माण झाला होता.त्यातून ही प्रकरण उद्भवले असल्याचे मानले जात आहे.

     कोपरगाव नगरपरिषद निवडणूक गत 21 डिसेंबर रोजी अटीतटीची संपन्न झाली होती.त्यात भाजपच्या माजी आ.कोल्हे गटाने शिवसेनेच्या बंडखोर गटाच्या 04 जागांसह 19 जागा जिंकून बाजी मारली होती.तर काळे गटाला 11 जागा मिळून त्यांच्या जागेत मोठी वाढ झाली होती.त्यानंतर ज्या ठिकाणी अटीतटीची लढाई झाली अशा ठिकाणी अद्याप धुसफूस सुरू असून त्याचे पडसाद अद्याप उमटत असल्याचे मानले जात आहे.त्यात काल सायंकाळी कोपरगाव येथील बैलबाजार रोडला दोन गटात जोरदार हाणामारी झाली असल्याची बातमी हाती आली आहे.यात सत्ताधारी गटाच्या प्रभाग 13 मधून निवडून आलेल्या बांधकाम सभापती निलोफर पठाण यांचे पती फिरोज पठाण यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली असल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.या ठिकाणी सत्ताधारी गटांचे गटनेते प्रसाद आढाव हे उपस्थिती होते अशी माहिती हाती आली आहे.त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.मात्र ही घटना किरकोळ असल्याचा व आपणच दोन्ही गटांची हाणामारी सोडवली असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत शहर पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.व जखमी पठाण यांनी उपचार झाल्या नंतर आपण गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.तर आमच्या प्रतिनिधीने या बाबत बांधकाम सभापती निलोफर पठाण यांचे पतीशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे पुतणे हे किरकोळ टपरी धारक यांना होलसेल खाद्य पदार्थ विकत असून त्याची उधारी कुरेशी यांचेकडे मागण्यास गेले असता त्यावरून किरकोळ शाब्दिक वाद निर्माण झाला असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

   दरम्यान एका माहितीनुसार फिरोज पठाण यांचे पुतणे यांचा होलसेल चॉकलेट,बिस्कीट,कुरकुरे आदी विक्री करण्याचा व्यवसाय असून तो उधारी मागण्यास गेला होता.त्यात तो 750  मागत होता तर समोर किराणा दुकानदार असलेली कुरेशी नामक महिला 700 रूपये उधारी असल्याचा दावा करत होती.त्यावरून दोघांत वाद निर्माण झाला होता.त्याचा राग मनात धरून पठाण यांच्या पुतण्या हा क्रिकेट मैदांनावर आला असता त्याला मारहाण केली असल्याची माहिती हाती आली आहे.ती माहिती सभापती असलेल्या महिलेचा पती फिरोज पठाण यांना समजल्यावर ते घटनास्थळी आल्यावर त्यांनाही लोखंडी गजाने कुरेशी यांनी मारहाण केली असल्याची माहिती आहे.या हाणामारीने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

   दरम्यान या वादावादीने ऐन बारावीच्या परीक्षा सुरू असताना सुरू केलेल्या क्रिकेट स्पर्धा आयोजकांना बंद कराव्या लागल्या असल्याची नामुष्की पत्करावी लागली असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत शहर पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.व जखमी पठाण यांनी उपचार झाल्या नंतर आपण गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.तर आमच्या प्रतिनिधीने या बाबत बांधकाम सभापती निलोफर पठाण यांचे पतीशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे पुतणे हे किरकोळ टपरी धारक यांना चॉकलेट,बिस्कीट,कुरकुरे आदी पदार्थ विकत असून त्याची उधारी कुरेशी यांचेकडे मागण्यास गेले असता त्यावरून किरकोळ शाब्दिक वाद निर्माण झाला असल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.तो वाद आपण समक्ष जाऊन मिटवला होता.मात्र तो नंतर क्रिकेट स्पर्धा पाहण्यास गेला असता त्यावर काहींनी आक्षेप घेऊन मारहाण केली असल्याचे म्हटले आहे व विरोधी आ.काळे गटाने त्याला राजकीय रंग भरला असल्याचा आरोप केला आहे.

  दरम्यान या वादावादीने ऐन बारावीच्या परीक्षा सुरू असताना सुरू केलेल्या क्रिकेट स्पर्धा आयोजकांना बंद कराव्या लागल्या असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.तरी झालेल्या प्रकाराबद्दल शहरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close