सहकार
…या कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गणेश सहकारी साखर कारखाना हा चांगला चालला तर या परिसराची अर्थव्यवस्था चांगली आणि गतिमान राहणार असून या भागातील शेतकऱ्यांनी गणेश कारखान्यालाच ऊस द्यावा व गणेश कारखान्याचे हित जपावे असे आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गणेश सहकारी कारखाना 90 दिवस चालला आणि त्यातून दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करू शकला.गणेशच्या कार्यक्षेत्रातून विखे कारखान्याने 80 हजार टन,कोळपेवाडी कारखान्याने 40 हजार टन ऊस नेला असुन हा प्रकार थांबला नाही तर आम्हीही यांच्या कारखाना कार्यक्षेत्रात टोळ्या टाकू”-विवेक कोल्हे,अध्यक्ष सहकार महर्षी कोल्हे कारखाना.
राहाता तालुक्याची कामधेनू गणल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून एक लाखाहून अधिक उसाचे गळीत केले असून त्याच्या गळीत हंगामाची सांगता नुकतीच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते व सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी अध्यक्ष ॲड.नारायण कार्ले,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,शिवाजीराव लहारे,कार्यकारी संचालक जी.बी. शिंदे,संगमनेरचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,संजीवनीचे महाव्यवस्थापक दिवटे,ॲड.पंकज लोंढे,धनंजय गाडेकर,नगरसेवक शशिकांत लोळगे,विक्रांत दंडवते,गंगाधर पा.चौधरी,संचालक बाबासाहेब डांगे,शोभाताई गोंदकर,संपतराव हिंगे,गंगाधर डांगे,भगवानराव टिळेकर,महेंद्र गोर्डे,ज्ञानदेव चोळके,अनिल गाढवे,विष्णुपंत शेळके,संपतराव चौधरी,अरुंधती फोपसे,मधुकर सातव,अरविंद फोपसे,बलराज धनवटे,लताताई डांगे,आप्पासाहेब बोठे,रघुनाथ गाडेकर,कोंडाजी लांडगे,रामभाऊ बोरबने,उत्तमराव मते,कैलास रहाणे,अनिल बोठे, धुकर वाबळे,शरद कडू,संजय शेळके,प्रा.एल.एम.डांगे,ॲड.अतुल लहारे,संगमनेर कारखाना कार्यकारी संचालक श्री घूगरकर,आदींसह सभासद,कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी प्रारंभी गणेश कारखान्याचे संचालक नानासाहेब काशिनाथ नळे व त्यांच्या पत्नी सुनीता,संचालक बाळासाहेब पुंडलिक चोळके व त्यांच्या पत्नी संगीता या उभयतांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली आहे.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”गणेश कारखानाच्या वाटचालीत संकट आणि अडथळ्याची मालिका सुरू आहे,रोज वाटेत काटे टाकण्याचे काम चालूच आहे,साडेतीन लाख टनऊस गाळपास होता.उसाची पळवा पळवी झाली.गणेश या परिसराची कामधेनू आहे.अशाने या परिसराची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल.वास्तविक गणेश चांगला चालण्यासाठी या भागातील सभासद शेतकरी यांनी आपला ऊस गणेशलाच दिला पाहिजे.गणेश वरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.खरे तर कोल्हे व आम्ही गणेशला समर्थ करण्याचेच काम करत आहोत.कारखाना पुढे कसा जाईल याचाच विचार आम्ही करतो.गणेश कारखान्याची गाळप क्षमता आपण वाढवू,मोलाचे रूपांतरण कुठे करायचे ते ठरवू,काही कारखान्यांनी त्यांच्या गाळप क्षमता वाढवल्या आहेत.त्यामुळे ते इकडे तिकडे घुसतात,गणेश परिसरातील उसाची विल्हेवाट नको,गणेश या परिसराचे हक्काचे साधन आहे त्याला जपले पाहिजे,आम्ही ऊस जाळायची वेळ येऊ देणार नाही.तुम्ही आम्हाला साथ द्या,आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू,आम्ही तुमच्या मदतीला आलो आहोत.विवेक कोल्हे यांनी गणेशला चांगली मदत केली आहे.
यावेळी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की,’गणेश कारखान्याचे या गाळाप हंगामात साडेतीन लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाची उद्दिष्ट होते.परंतु उसाची कार्यक्षेत्रातून होणारी विल्हेवाट,तसेच कारखान्यातील तांत्रिक अडचणी यामुळे कारखाना 90 दिवस चालला आणि त्यातून दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करू शकला.गणेशच्या कार्यक्षेत्रातून विखे कारखान्याने 80 हजार टन,कोळपेवाडी कारखान्याने 40 हजार टन ऊस नेला असल्याचा आरोप केला आहे.तसेच इतर कारखान्याने 35 हजार टन ही ऊस नेला अशी दीड ते 1 लाख 60 हजार मेट्रिक टन उसाची विल्हेवाट लावली.कुणीही येऊन आक्रमण करावे अशी अफगाणिस्तानची अवस्था असते,तसे उसाच्या बाबतीत गणेश ची अवस्था झाली असल्याचा आरोप केला आहे.गणेश कारखान्यात आधुनिकीकरण केल्याने अनेक चांगले फायदे झाले.गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुढील हंगामासाठी 2 लाख 60 हजार मेट्रिक टन ते 3 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल.जर पुढील हंगामात इतर कारखान्यांनी गणेशच्या कार्यक्षेत्रात उसाची विल्हेवाट लावली तर आम्हीही त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात टोळ्या टाकू असा इशारा विवेक कोल्हे यांनी शेवटी दिला आहे.
सदर प्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे म्हणाले,”संगमनेर व संजीवनी या दोन्ही कारखान्यांचे या गाळप हंगामासाठी सहकार्य मिळाले.टरबाइन चा खोळंबा झालेला असतानाही कारखान्याने दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने दोन लाख मेट्रिक टन गाळप केले.कारखान्याचे पेट्रोल पंप सुरू झाला.कारखान्याच्या यंत्रातही चांगले बदल केले.काही कारखान्यांनी गणेश कारखान्याचा ऊस पळवून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला.शेतकऱ्यांचा गणेश कारखान्याच्या काट्यावर विश्वास आहे.त्यामुळे पुढील हंगामात विल्हेवाट झालेला ऊस पुन्हा गणेश कारखान्याला येईल असा विश्वास अध्यक्ष लहारे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.बी.शिंदे यांनी केले गणेश कारखान्याकडे पुढील हंगामासाठी 2529 हेक्टर क्षेत्राची नोंद आतापर्यंत झाली आहे.पुढील हंगामासाठी साडेतीन लाख मे.टन गाळपाचे नियोजन आहे.एक नवीन काटा.बॉयलिंग हाऊसचे कामही पूर्ण झाले आहे.गणेशने उत्पादित केलेला साखरेचा दर्जाही उत्तम आहे.अधिकारी कामगार यांनी चांगले काम केले आहे असे ही श्री.शिंदे म्हणाले.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे सचिव नितीन भोसले यांनी केले तर आभार संचालक आलेश कापसे यांनी मानले आहे.



