जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पत्रकारावर बदनामीचा आरोप,जिल्हा न्यायालयाने फेटाळा अर्ज!

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील फिर्यदि स्व.नानासाहेब माधवराव औताडे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता मारहाण केल्या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याची व अटकेची बातमी ‘न्यूजसेवा’ वेब पोर्टलला प्रसिद्ध केल्या प्रकरणी संपादक नानासाहेब जयराम जवरे यांचे विरुद्ध आधी अतिरिक्त सत्र न्यायाधीश,कोपरगाव यांचेकडे आपली पत्रकार नानासाहेब जवरे यांनी बदनामी केली अशी खाजगी तक्रार दाखल केली होती.ती संबंधित न्यायालयाने फेटाळल्यावर त्याचे विरुद्ध तक्रारदार नितीन भानुदास औताडे यांनी कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केले होते.ते जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.दिपक अलमले यांनी फेटाळले असल्याची माहिती प्रतिवादीचे वकील ॲड.योगेश खालकर यांनी दिली आहे.याबाबत प्रतिवादी पत्रकार नानासाहेब जवरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

“तक्रार प्राप्त झाल्यावर सत्र न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अन्वये अपेक्षित चौकशी केली आहे आणि तक्रारदाराचा पडताळणी जबाब नोंदवला आहे आणि त्यांना असे आढळून आले आहे की,”भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ चे आवश्यक घटक पूर्ण होत नाहीत.सत्र न्यायालयाने योग्य कारणे नोंदवली आहेत आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०३ चा आधार घेऊन नितीन औताडे यांची तक्रार फेटाळली आहे.त्यामुळे,माझ्या मते आक्षेपित आदेश कायदेशीर,योग्य आणि अचूक आहे आणि म्हणून त्यात कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.त्यामुळे फौजदारी पुनरीक्षण अर्ज क्र.-०७/२०२२ याद्वारे फेटाळण्यात येत आहे”-न्या.दिपक अलमले,जिल्हा व सत्र न्यायालय,कोपरगाव.

      याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील मयत तक्रारदार व हॉटेलचे चालक नानासाहेब माधवराव औताडे व त्यांचे भाऊ व घरातील सदस्य यांना जयकिसान पेट्रोल पंपासमोर नितीन भानुदास औताडे, ऋत्विक नितीन औताडे,अमोल भाऊसाहेब औताडे व तुषार भानुदास औताडे या चार आरोपींनी दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आधी वाईटसाईट शिवीगाळ करून फायटर,लाकडी दांडके,लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.व जीवे मारण्याची धमकी दिली होती.यावेळी फिर्यादीची आई मंदाबाई औताडे यांच्या कानाचा वेल गहाळ झाला होता.तर फिर्यादीचा नानासाहेब औताडे यांचा उजवा हात मोडला होता.तर आई मंदाबाई औताडे यांचा दात तुटला होता.या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.६६/२०२१भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे आरोपीवर वरील चार आरोपींवर कलम ३२५,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

“अहिल्यानगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे हे सातत्याने नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांविरुद्ध व सामाजिक कामांना न्याय देण्यासाठी तीन दशकांहून अधिक काळ आपली लेखणी चालवत असून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत.मात्र काही असामाजिक तत्व त्यांचे बिंग फुटत असल्याने त्यांना अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.मात्र अशा असामाजिक तत्वांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने चांगलीच चपराक दिली असून ॲड.योगेश खालकर यांनी त्यांना न्याय देण्यासाठी सहाय्य केले आहे.परिणामी वस्तुनिष्ठ पत्रकारांना आता त्रास देण्याचे धाडस कोणी करणार नाही”-शिवाजी गायकवाड,माजी अध्यक्ष,कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटना.

   दरम्यान या प्रकरणी प्रमुख आरोपी नितीन औताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.त्याबाबतचे पोलिस व विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त बातमी ‘न्यूजसेवा’ वेब पोर्टलला दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली होती.त्यावर तक्रारदार नितीन औताडे यांनी प्रारंभी दिनांक कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचेकडे (एस.एस.सी.) क्रमांक २२५/२०२१ अन्वये तक्रार दाखल करून ‘न्यूजसेवा’ वेब पोर्टलच्या,या वस्तुनिष्ठ बातमीने समाजात आपली बदनामी झाली असल्याचा दावा केला होता.व त्याबाबत कोपरगाव न्यायालयात तक्रारदार नितीन औताडे हे पोहेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक असून त्यांची समाजात मोठी प्रतिष्ठा (?) असल्याचा दावा करून खाजगी अर्ज दिनांक १५ जानेवारी २०२२ दाखल करून फिर्यादी नानासाहेब औताडे व ‘न्यूजसेवा ‘चे संपादक नानासाहेब जवरे यांचे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९,५०० सहसंबद्ध ३४ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०० अन्वये न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती व त्याबाबत न्यायालयात दाद मागितली होती.मात्र कोपरगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ती तक्रार (फौजदारी पुनरीक्षण अर्ज क्र.०७/२०२२) दाखल होण्यापूर्वीच फेटाळली होती.त्यात त्यांनी म्हटले होते की,”१५ जानेवारी २०२२ चा आक्षेपित आदेश कायदेशीर,योग्य आणि अचूक आहे.मात्र तेवढ्यावर ही मंडळी थांबली असेल तर नवल ! त्यांनी याबाबत आपले वकील ॲड.शिवाजी खामकर यांचे मार्फत पुन्हा एकदा कोपरंगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.दिपक अलमले यांचेकडे त्या निकालाविरुद्ध फौजदारी पुनरीक्षण अर्ज क्र. ०७/२०२२ अन्वये अपील करून दाद मागितली होती.त्यावेळी संपादक नानासाहेब जवरे यांनी आपली बाजू मांडण्यासाठी ॲड.योगेश खालकर यांचे मोफत विधी सहाय्य घेऊन नेमणूक केली होती.त्याबाबत नुकतीच सुनावणी दिनांक १७ जुलै २०२६ रोजी पूर्ण झाली असून यात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.दिपक अलमले यांनी अर्जदार नितीन औताडे यांचा अर्ज दोन्ही वकिलांचा अभ्यासपूर्ण मांडणी केलेला दावा सपशेल फेटाळला आहे.याबाबत संपादक नानासाहेब जवरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.दिपक आलमले यांच्या या निकालाचे स्वागत केले आहे.व न्यायालयाचे व मोफत विधी सहाय्य पुरवणारे वकील योगेश खालकर यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close