जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेच्या खोल्यांसाठी मोठा निधी मंजूर-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची वर्गखोल्यांची समस्या दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या ३० लाख रुपयांच्या निधीतून सहा नवीन वर्गखोल्या व शिक्षकांसाठी स्टाफ रूमचे बांधकाम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी दिली आहे.

  “शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा खोल्यांच्या समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.छतांचे प्लास्टर पडणे आणि भिंतींना तडे गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.पावसाळ्यात पाणी गळतीमुळे वर्ग बंद ठेवावे लागतात किंवा शाळांना सुट्टी द्यावी लागते.वीज,पुरेसे दिवे,पंखे आणि बसण्यासाठी बाकांची कमतरता असते.स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येते.ही बाब आपण आ.आशुतोष यांचे लक्षात आणून दिली आहे.परिणामी हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे”- महमूद सय्यद,नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.

   कोपरगाव शहरातील उर्दू शाळांमधील खोल्यांची दुरवस्था ही खरोखरच एक अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब बनली आहे.शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.छतांचे प्लास्टर पडणे आणि भिंतींना तडे गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.पावसाळ्यात पाणी गळतीमुळे वर्ग बंद ठेवावे लागतात किंवा शाळांना सुट्टी द्यावी लागते.वीज,पुरेसे दिवे,पंखे आणि बसण्यासाठी बाकांची कमतरता असते.स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येते.गैरसोयींमुळे पालक आपल्या मुलांना उर्दू शाळांमधून काढून इतर शाळांमध्ये प्रवेश घेतअसल्याची बाब नगरपरिषदेचे नगरसेवक महमूद सय्यद यांनी आ.काळे यांचे लक्षात आणून दिली होती.त्यानंतर आ.काळे यांनी या निर्णय घेतला आहे.परिणामी निधी उपलब्ध करून दिल्याने आता विद्यार्थ्यांना प्रशस्त वर्गखोल्या आणि अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत.नवीन वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे त्याबद्दल मुस्लीम समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

   यावेळी नगरसेवक सय्यद म्हणाले की,”शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याची काळे परिवाराची परंपरा यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.यापूर्वी स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांनीही उर्दू हायस्कूलच्या वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता.तसेच माजी आ.अशोक काळे यांनी देखील मुस्लिम समाजाच्या मागणीनुसार वेळोवेळी निधी दिला होता.याची आठवण करून दिली आहे.दरम्यान या निधीबद्दल नागरिकांनी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close