शैक्षणिक
..या महावदियालयातील प्राध्यापक सेवानिवृत्त !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय कोपरगाव येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.सुभाष सैंदनशिव हे नुकतेच आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे.त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बंडेराव तऱ्हाळ होते.

महाविद्यालयातील प्राध्यापकांचा सेवानिवृत्ती सोहळा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून,तो कृतज्ञता,आदर आणि आठवणींचा एक भावुक संगम असल्याचे मानले जाते.कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाराज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.सुभाष सैंदनशिव हे नुकतेच आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले
आहे.त्यांचा सेवक कल्याण मंडळातील सहकाऱ्यांनी व महाविद्यालयाच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.घनश्याम भगत यांनी प्रा.सैंदनशिव यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाचे कौतुक केले.

सदर कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी,सर्व विज्ञान शाखेतील विभागप्रमुख,प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.निलेश मालपुरे यांनी मनोगत व्यक्त करून प्रा.सैंदनशिव यांच्या सेवाभावी वृत्तीचा,कर्तव्यनिष्ठेचा आणि महाविद्यालयीन कामकाजातील योगदानाचा गौरव केला.प्रा.मोहनसिंग पाडवी,डॉ.विलास गाडे व योगेश खिल्लारी यांनीही मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.निलेश मालपुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.नामदेव आडमुठे यांनी मानले आहे.



