जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…”त्या ” दरोड्यातील आरोपीला नियमित जामीन मंजूर!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)  

  तत्कालीन शिर्डी पोलीस ठाण्याचे हद्दीत मात्र कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव हद्दीत दागिने दुकानातील दरोडा प्रकरणातील आरोपी फैजल शब्बीर पठाण याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिपक डी.अलमले यांच्या न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी फैजल पठाण याला ११ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली होती.दरम्यान शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये त्याचे नाव नसून त्याच्याकडून कोणताही मुद्देमाल जप्त झाला नसल्याचे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.अभियोक्ता पक्षाने साक्षीदारांना धमकावण्याची व तपासात अडथळा येण्याची शक्यता वर्तवत जामिनास विरोध केला होता, मात्र न्यायालयाने आरोपीचा पुढील ताबा आवश्यक नसल्याचे नमूद करत ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक व सुरक्षा जामिनावर त्याची सुटका करण्याचे आदेश कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”दिनाक २१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील सराफांच्या सोनाराच्या तीन अज्ञात व्यक्तींनी पिस्तूल, तलवार व विळा दाखवून सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती.आरोपींनी पळून जाताना फिर्यादी व त्याच्या मलाने प्रतिकार केला असता झालेल्या झटापटीत मुलगा जखमी झाला होता.या प्रकरणात आदित्य बागुल व फराज एजाज सय्यद हे दोन आरोपी आधीच अटकेत असून त्यांच्याविरद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

  आरोपी फैजल पठाण याला ११ ऑगस्ट २०२६ रोजी अटक करण्यात आली होती.दरम्यान शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये त्याचे नाव नसून त्याच्याकडून कोणताही मुद्देमाल जप्त झाला नसल्याचे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.अभियोक्ता पक्षाने साक्षीदारांना धमकावण्याची व तपासात अडथळा येण्याची शक्यता वर्तवत जामिनास विरोध केला होता, मात्र न्यायालयाने आरोपीचा पुढील ताबा आवश्यक नसल्याचे नमूद करत ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक व सुरक्षा जामिनावर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहे. जामिनाच्या अटींनुसार आरोपीला दर सोमवारी तपास अधिकाऱ्यसमोर हजर राहावे लागणार आहे.

  दरम्यान यात आरोपीच्या वतीने अ‍ॅड.जयंत आत्माराम जोशी यांनी बाजू मांडली आहे तर त्यांना अ‍ॅड.संकेत जानी ॲड.शिवम मोरे,अ‍ॅड.तन्मय घोडके व अ‍ॅड.सुरेंद्र जाधव यांनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close