आंदोलन
कोपरगाव तालुक्यात…या रस्त्याची दुरावस्था,ग्रामस्थ संतप्त !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस नाटेगाव आणि येसगाव या परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी महत्वाचा असलेला नाटेगाव-येसगाव रस्त्याची पार रया गेली असून वर्तमानात या मार्गाने जाणे ही मोठी शिक्षा ठरत असून हा रस्ता तातडीने मजबुतीकरण करणे गरजेचे आहे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा येथील कार्यकर्ते खंडू मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.

नाटेगाव येथील बँक,शाळा,तलाठी कार्यालय आदी सर्व प्रशासकीय कामे येसगाव येथे असल्याने ग्रामस्थांना दैनदिन याच मार्गाचा वापर करावा लागत आहे.त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना याच मार्गाचा वापर करावा लागत आहे.त्यामुळे रोजच मृत्यूचा सामना करावा लागत आहे.याची दखल लोकप्रतिनिधी घेणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची दुरावस्था नागरिकांना नवी नाही.आता त्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची भर पडून या रस्त्याची दुरावस्था हा आर्थिक आणि सामाजिक विकासाला खीळ घालणारा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.खड्डे,उखडलेले डांबर आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे दैनंदिन जनजीवन,शेती व्यवसाय आणि आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होत असून,या समस्येकडे प्रशासनाने कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.या दुरावस्थेचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना भोगावे लागत असून त्यांच्या शेतीमालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.खराब रस्त्यांमुळे शेतमाल वेळेवर आणि सुरक्षितपणे बाजारपेठेत पोहोचत नाही.यामुळे मालाची नासाडी होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.गरोदर महिला किंवा गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकत नाही,ज्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येतो.रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे आणि धूळ यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.अनेकदा दुचाकी घसरून गंभीर दुखापती होतात.त्यांची किंमत स्थानिकांना चुकवावी लागत आहे.खराब रस्त्यांमुळे शाळकरी मुलांची बस किंवा वाहने वेळेवर धावत नाहीत,परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि नागरिकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे.कोपरगाव तालुक्याला आता दोन लोकप्रतिनिधी असून त्यांना या समस्येकडे पहायला वेळ मिळेल का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.नाटेगाव पासून येसगाव पर्यंत 05 कि.मी.असलेला हा रस्ता पहिल्यांदा सन-2019 साली साली आशुतोष काळे हे पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी पाहिला 340 मीटरचा पहिल्या टप्पाचे त्यांनी डांबरीकरण केले होते.त्यानंतर दुसरा टप्पा 400 मीटरचा झाला होता.तर तिसऱ्यांदा 800 मीटरचे काम झाले होते.गेल्या पंधरा वर्षात 05 कि.मी.पैकी केवळ दिड कि.मी.चे काम आजपर्यंत करण्यात आले आहे.अद्याप साडेतीन कि.मी.रस्त्याला निधी मिळालेला नाही.परिणामी हा जिल्हा मार्ग असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे.नाटेगाव येथील बँक,शाळा,तलाठी कार्यालय आदी सर्व प्रशासकीय कामे येसगाव येथे असल्याने ग्रामस्थांना दैनदिन याच मार्गाचा वापर करावा लागत आहे.त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना याच मार्गाचा वापर करावा लागत आहे.त्यामुळे रोजच मृत्यूचा सामना करावा लागत आहे.याची दखल लोकप्रतिनिधी घेणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा खंडू मोरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.त्यामुळे आता या जिल्हा मार्गासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.



