पर्यटन व तीर्थक्षेत्र
…तर पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी येऊ देणार नाही-इशारा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीसाठी करणाऱ्या साधू-संत व वारकऱ्यांवरील अन्याय न थांबवल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही असा इशारा श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
“हिंदूंच्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये मुस्लिम व ब्रिटिश राजवटीमध्येही खंड पडला नाही.परंतु राज्य सरकारने हिंदूविरोधी भूमिका घेतल्याने प्रथमच वारीमध्ये खंड पाडला आहे”-सचिन गुलदगड,अध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ.
करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले असून, पायी पंढरपूरला जाणाऱ्या कोणत्याही दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.जिल्हाधिकाऱ्यांकडून दिंड्या आणि भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी प्रवास पास दिले जाणार नाहीत,’असे विभागीय आयुक्त यांनी जाहीर केले आहे.
पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर परिसरात करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे मंदिर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्यातूनही दिंड्या पंढरपूरकडे येणार नाहीत’असे आदेश दिल्याने त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास प्रारंभ सुरु झाला आहे.तर काहींनी थेट राज्य सरकारवर हल्ला बोल केला आहे.याच पार्श्वभूमीवर हि प्रतिक्रिया आली आहे.
त्यात गुलदगड यांनी पुढे म्हटले आहे की,”हिंदूंच्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये मुस्लिम व ब्रिटिश राजवटीमध्येही खंड पडला नाही.परंतु राज्य सरकारने हिंदूविरोधी भूमिका घेतल्याने प्रथमच वारीमध्ये खंड पाडला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी भूमिका घेत आहेत.सरकारला हॉटेल,मॉल, दुकानातील गर्दी चालते.पंढरपूरच्या निवडणुकीतील गर्दी चालते,दारूची दुकाने चालतात मात्र पंढरपूरची वारी चालत नाही.या वेळी संघाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.