गुन्हे विषयक
‘त्या’आत्महत्या प्रकरणी पाच आरोपींवर कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तीळवणी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली महिला सोनाली धनंजय गायके (वय-२४) हिने काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या घरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी फिर्यादी व मयत महिलेचे पिताश्री दादासाहेब हरिभाऊ खटकाळे (वय-५२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हुंडाबळीतून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा आरोपी नवरा धनंजय भाऊसाहेब गायके,सासरा भाऊसाहेब भागाजी गायके,सासू लिलाबाई भाऊसाहेब गायके,दीर सागर भाऊसाहेब गायके,मनोज भाऊसाहेब गायके सर्व रा.तीळवणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मयत महिलेचे व तिच्या पती व्यसनी असल्याने त्यांचे अज्ञात कारणावरून वारंवार भांडण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तथापि मयत महिलेचे सासू,सासरे,दीर आदी विभक्त राहात असताना त्यांना या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याची प्रतिक्रिया तीळवणी परिसरात व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सोनाली धनंजय गायके (वय-२४) या महिलेने आपल्या घरात कालं सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यामुळे तीलवणी परिसरात खळबळ उडाली होती.या प्रकरणी शवविच्छेदन केल्यानंतर मयत महिलेचे वडील दादासाहेब हरिभाऊ खटकाळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यात आरोपी म्हणून मयत महिलेचा आरोपी नवरा धनंजय भाऊसाहेब गायके,सासरा भाऊसाहेब भागाजी गायके,सासू लिलाबाई भाऊसाहेब गायके,दीर सागर भाऊसाहेब गायके,मनोज भाऊसाहेब गायके सर्व रा.तीळवणी यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४९८(अ),३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यात मयत महिलेच्या वडिलांच्या वडिलांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”माझी मुलगी नामे सोनाली हिचे लग्नानंतर सहा महिन्यांनी ते आजपावेतो यातील आरोपी मजकूर यांनी यातील मयत हीच वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून तिला माहेरून पैसे घेऊन ये” अशी मागणी करून यातील मयत हिस वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला यातील आरोपी मजकूर यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेवगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहेयाबाबत कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.नोंद क्रं.२६८/२०२१ भा.द.वि.४९८,(अ)३०६,३४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नीं.सुरेश आव्हाड हे करीत आहेत.