जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

श्री साईचरणी १५ लाख रुपये किमतीचा हिरेजडित ब्रोच अर्पण

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा नवी नाही.भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करत असतात.अशाच प्रकारे आज एका साईभक्ताने अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा,७६ ग्रॅम २७० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हिरेजडित मोरपिसाच्या आकाराचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला असल्याची माहिती संस्थान व्यवस्थापनाने दिली आहे.


   दरम्यान ही मौल्यवान देणगी श्री साईबाबांप्रती असलेल्या श्रद्धा व भक्तीभावाचे प्रतीक मानली जात आहे. देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला आहे.सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close