आंदोलन
कर्जमाफीच्या आदेशाची होळी,शेतकऱ्यांत संताप!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नेवासा शेतकरी संघटनेतर्फे फसवी कर्जमाफीच्या आदेशाची होळी करण्यात आली असून त्याविरोधात आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी केलेआहे.या प्रकरणी राज्य सरकारला जाब विचारला आहे.

भाजपने विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना फसवले असल्याचा आरोप केला आहे.राज्य सरकारांच्या या कर्जमाफीला राज्यभरातून विरोध होत आहे.त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका अपवाद नाही.या कर्जमाफीला शेतकऱ्यांनी केलेला जोरदार विरोध.सन -2017 साली भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना आधी फसवले आहे.
महाराष्ट्र सरकारने जून २०२६ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांचे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे.या नवीन कर्जमाफी योजनेचे मुख्य निकष,अटी वादग्रस्त ठरल्या आहे.ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज २ लाख रुपयांपर्यंत थकीत आहे,त्यांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार असून.एकवेळ समझोता योजना (ओ. टी.एस)अंतर्गत ज्यांचे कर्ज २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत भरल्यानंतर त्यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.त्याला शेतकरी संघटनानी विरोध केला आहे.भाजपने विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना फसवले असल्याचा आरोप केला आहे.राज्य सरकारांच्या या कर्जमाफीला राज्यभरातून विरोध होत आहे.त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका अपवाद नाही.या ठिकाणी नुकतेच आंदोलन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाध्यक्ष अशोक काळे,उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे,बेल पिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले,भाऊसाहेब कावळे,सचिन वेताळ,सुजित बोडखे,खंडेराव सरोदे,वसंत शेरकर,पुंडलिक सरोदे,मुमताज सय्यद,भाऊसाहेब तराळ.नाना गारुळे,संजय डिके,कानिफनाथ डिके,ॲड.सर्जेराव घोडे,बाबासाहेब वेताळ,संभाजी श्रीराम कदम,भानदास कांगणे आदीसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



