निधन वार्ता
सेवानिवृत्त शिक्षक कार्ले सर यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे सेवानिवृत गणिताचे प्रसिद्ध शिक्षक विजय नारायण कार्ले (वय -62) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे सायंकाळी 05 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

स्व.विजय कार्ले यांनी आधी शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पाच वर्षे सेवा बजावली होती.त्यानंतर त्यांनी श्रीमान गोकुळचंद विद्यालयात सेवेची 25 वर्षे पूर्ण करून सायंकाळ त्याच ठिकाणी घालवली होती.व ते दि.20 जून 2024 रोजी ते सेवानिवृत झाले होते.गणित या विषय आवडता होता.कायम चेहऱ्यावर हास्य आणि गणितासारखा किचकट विषय असतानाही यांनी तो सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या गळी उतरविण्याचे कसब कमावले होते.
स्व.विजय कार्ले हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी होते.त्यांनी आधी शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पाच वर्षे सेवा बजावली होती.त्यानंतर त्यांनी श्रीमान गोकुळचंद विद्यालयात 1990 साली आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरूवात करून सेवेची 25 वर्षे पूर्ण करून सायंकाळ त्याच ठिकाणी घालवली होती.व ते दि. 20 जून 2024 रोजी सेवानिवृत झाले होते.गणित या विषय आवडता होता.कायम चेहऱ्यावर हास्य आणि गणितासारखा किचकट विषय असतानाही यांनी तो सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या गळी उतरविण्याचे कसब कमावले होते.नव्हे तो त्यांचा आवडीचा विषय होता.त्यांनी श्रीमान गोकुळचंद विद्यालयात अनेक विद्यार्थी घडवले होते.ते अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे म्हणून श्रीमान गोकुळचंद विद्यालय परिसरात परिचित होते.
स्व.कार्ले यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,डॉ.अमोल अजमेरे,लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेश ठोळे,डॉ.दत्तात्रय मुळे त्यांचे सहकारी व माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर आदींनी दुःख व्यक्त केले आहे.


