पर्यटन व तीर्थक्षेत्र
साईबाबांच्या चरणी सुवर्ण मुकुट !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे.भाविक भक्तिभावाने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करत असतात.अशाच प्रकारे आज पंजाब राज्यातील भटींडा येथील साईभक्त अजय कुमार यांनी श्री साईबाबांच्या चरणी २०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.हा मुकुट श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदर मुकुटाची किंमत सुमारे २९ लाख १९ हजार ८०० रुपये आहे.

या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी दानशूर साईभक्त श्री अजय कुमार यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.तसेच आज एका साईभक्ताने सुमारे ०५ लाख ४० हजार १६३ रुपये किंमतीचा, आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.



