जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

…या ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील घारी या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे अनेकांच्या आशा आकांक्षांवर पाणी पडले आहे तर काहीना अनपेक्षित संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान,सन-२०२० च्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाने ९ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या,तर काळे गटाने ४ जागांवर विजय मिळविला होता.मात्र नंतर कोल्हे गटातील एका सदस्याने काळे गटाला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलली होती.परिणामी सरपंच तसेच उपसरपंच ही दोन्ही पदे काळे गटाकडे जाऊन त्यांची दहा बोटे तुपात गेली होती.यावेळी कार्यकर्ते किसन पवार आपला गट या मैदानात उतरवणार की, थडीवर उभे राहून गंमत पाहणार हे लवकरच समजणार आहे.

   जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत दि.१० जून रोजी जाहीर करण्यात आली आहे.या सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम सध्या सुरू असून महिलांसाठी ५० टक्के आरक्षणासह इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या लोकसंख्येनुसार जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घारी ग्रामपंचायतीच्या आरक्षणाकडे गावकऱ्यांचे विशेष लक्ष लागून राहिले होते.मंडलाधिकारी कोल्हे,तलाठी देढवाल आणि ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली आहे.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मधील तीन जागांपैकी एक जागा अनुसूचित जमाती,एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला आणि एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.तर प्रभाग क्रमांक २ मधील तीन जागांपैकी दोन जागा सर्वसाधारण महिला तर एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.याशिवाय प्रभाग क्रमांक ३ मधील तीन जागांमध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे.

  दरम्यान,सन-२०२० च्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे गटाने ९ पैकी ५ जागा जिंकल्या होत्या,तर काळे गटाने ४ जागांवर विजय मिळविला होता.मात्र नंतर कोल्हे गटातील एका सदस्याने काळे गटाला पाठिंबा दिल्याने समीकरणे बदलली होती.परिणामी सरपंच तसेच उपसरपंच ही दोन्ही पदे काळे गटाकडे जाऊन त्यांची दहा बोटे तुपात गेली होती.

  त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही राजकीय घडामोडी रंगल्या होत्या.त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून या क्षेत्रात नवखे असलेल्या किसन पवार यांनी निवडणूक लढवत जोरदार आव्हान उभे केले होते.अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत त्यांचा निसटता पराभव झाला होता.ही निवडणूक तालुकाभर चर्चेचा विषय ठरली होती.
गेल्या काही वर्षांत किसन पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.प्लांटची मागणी, शासकीय कार्यालयांतील विविध कामे,रेशन कार्ड,संजय गांधी निराधार योजना,उत्पन्न व जातीचे दाखले,विधवा महिलांच्या योजनांसह अनेक कामांसाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात,याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर घारी ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले असून उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close