पर्यटन व तीर्थक्षेत्र
शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांचा राजीनामा ?

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
गेल्या काहीवर्षात कोपरगाव बेट येथील दैत्य गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे प्रसिद्धी पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.त्यामुळे कोपरगावच्या धार्मिक अध्यात्मिक वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

“गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट’चे काम करत असताना केलेला मंदिराचा जीर्णोध्दार,गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,साजरे केलेले धार्मिक सणउत्सव,दुर्लक्षित झालेल्या मंदिराला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे भाग्य आपल्याला गुरू शुक्राचार्य महाराजांच्या आशीर्वादाने मिळाले व त्यात लाखो शुक्र भक्तांचे व दानशूर व्यक्ती,जिवाभावाचा मित्र परिवार,कोपरगाव व बेट भागातील ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळी व सर्व पत्रकार बांधव यांचे लाभलेले सहकार्य मोलाचे आहे”-बाळासाहेब आव्हाड,मावळते अध्यक्ष,कोपरगाव बेट ट्रस्ट, कोपरगाव.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे गोदावरी नदीच्या काठावर ‘बेट’ परिसरात श्री दैत्य गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर असल्याचा दावा ट्रस्टच्या वतीने करण्यात येतो आहे.हे भारतातील एकमेव मंदिर आहे,जिथे विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही असा दावा करण्यात येत आहे.पौराणिक मान्यतेनुसार,दैत्य गुरु शुक्राचार्यांनी याच ठिकाणी घोर तपश्चर्या करून मृत्यूनंतर संजीवनी देणारी ‘संजीवनी विद्या’ प्राप्त केली होती.या मंदिराच्या परिसरात शुक्राचार्य,देवयानी आणि काचेश्वर यांची मंदिरे आहेत.या पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांचे सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात अशी आख्यायिका मानली जात आहे.या देवस्थानाची मोठी दुरावस्था झाली होती.मात्र या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सन-2017 साली निवड झाल्यानंतर हे मंदिर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले होते.त्यांनी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.याशिवाय मंदिर परिसराचा मोठा विकास केला असल्याचे मानले जाते.शिवाय वर्षभरात विविध सण-उत्सव,पुन्हा पूर्ववत सूर केले असल्याचे मानले जात आहे.त्याआधीच्या काळात त्यांनी सतरा वर्षे सचिव पद भूषवले होते.

दरम्यान या नव्या निवडीबाबत प्रस्तावित अध्यक्ष हेमंत पटवर्धन यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.”नवीन विश्वस्त मंडळात बाळासाहेब आव्हाड हे राहणार असल्याचे कळवले आहे.मात्र अद्याप आपण कार्यभार घेतलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.लवकरच कार्यभार स्वीकारला जाईल अशी माहिती दिली आहे.
दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक पत्रकार परिषदा आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करून या देवस्थानाला प्रकाशझोतात आणले होते.मात्र अलीकडील काळात जुने विश्वस्त आणि आव्हाड यांच्यात काही कारणावरून बेबनाव झाला असल्याच्या बातम्या कानावर आल्या होत्या.काही महिन्यापूर्वीच संजीवनी पार या ठिकाणी झालेल्या विकास कामाच्या उद्घाटनाला वेळी काही तरी गडबड जाणवत होती.मात्र सर्व काही आलबेल असल्याचे भासवले जात होते.मात्र यात कार्यरत असलेल्या जुन्या विश्वस्त मंडळाने उचल खावून गतवर्षीच बाळासाहेब आव्हाड यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढवलाअसल्याच्या बातम्या होत्या.मात्र त्यानंतर काही ना काही क्लुप्त्या वापरून त्याची चालढकल सुरू होती.अखेर गत मार्च महिन्यात संपन्न झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.आता आव्हाड यांचे जागी हेमंत पटवर्धन हे अध्यक्ष झाले असल्याची माहिती हाती आली आहे.तर विश्वस्त मंडळात एस.डी.कुलकर्णी,ॲड.दिलीप कोऱ्हाळकर,लेखा परीक्षक एस.एल.कुलकर्णी आणि बाळासाहेब आव्हाड आदी राहणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.दरम्यान या राजीनामा कारणात,”अर्थकारण” हेच बडे कारण असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.त्याला अधिकृत कोणीही दुजोरा दिला नाही.मात्र अद्याप नवीन विश्वस्त मंडळाने आपला कार्यभार हाती घेतलेला नाही अशी माहिती हाती आली आहे.
दरम्यान आव्हाड यांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,”गेली पंचवीस वर्षापासून अनेक अडथळे पार करत गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट चे काम करत असताना केलेला मंदिराचा जीर्णोध्दार,गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा,साजरे केले जात असलेले सर्व धार्मिक उत्सव,त्याद्वारे जीर्ण व दुर्लक्षित झालेल्या मंदिराचे नाव जगभरात प्रसिद्ध करून त्यास ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे भाग्य आपल्याला गुरू शुक्राचार्य महाराजांच्या आशीर्वादाने मिळाले व त्यात लाखो शुक्र भक्तांचे व दानशूर व्यक्ती,जिवाभावाचा मित्र परिवार,माझे कुटुंबीय तसेच कोपरगाव व बेट भागातील ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळी व सर्व पत्रकार बांधव यांचे लाभलेले सहकार्य मोलाचे आहे.या सर्वांच्या उपकारात ऋणी राहत आपण माझ्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट च्या अध्यक्ष पदाचा “राजीनामा” देत असल्याचे शेवटी मावळते अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान या नव्या निवडीबाबत प्रस्तावित अध्यक्ष हेमंत पटवर्धन यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.”नवीन विश्वस्त मंडळात बाळासाहेब आव्हाड हे राहणार असल्याचे कळवले आहे.मात्र अद्याप आपण कार्यभार घेतलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.लवकरच कार्यभार स्वीकारला जाईल मात्र त्याचा मुहूर्त व राजीनाम्याचे कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.



