जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

…या गावी दशरथे महाराज यांचे होणार प्रवचन !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   गोदावरी तालुका सहकारी दूध संघाचे माजी अध्यक्ष व दूध उत्पादकांचे नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या 22 व्या पुण्यस्मरणा निमित गुरूवार दि.१८ जून रोजी श्री क्षेत्र आळंदी येथील ह.भ.प.उमेश महाराज दशरथे यांचे,”ते ज्ञान ते बरवे ” यावर संवत्सर येथील नामदेवराव परजणे महाविद्यालयात प्रवचन संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा येथील ह.भ.प.उद्धवजी महाराज मंडलिक हे राहणार असून दि.19 व 20 जून रोजी विविध तज्ञांचे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

ह.भ.प.उमेश महाराज दशरथे

स्व.नामदेवराव परजणे हे कोपरगाव,अहिल्यानगर परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित सहकार,शिक्षण आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व होते.ते गोदावरी खोरे दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यांच्या योगदानामुळे या परिसराचा कृषी व दुग्धविकास क्षेत्रात मोठा विकास झाला असल्याचे मानले जाते.त्यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक,धार्मिक आणि लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

   

स्व.नामदेवराव परजणे.

  स्व.नामदेवराव परजणे हे कोपरगाव,अहिल्यानगर परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित सहकार,शिक्षण आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व होते.ते गोदावरी खोरे दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यांच्या योगदानामुळे या परिसराचा कृषी व दुग्धविकास क्षेत्रात मोठा विकास झाला असल्याचे मानले जाते.ते कोपरगाव येथील कै.नामदेवराव परजणे पाटील गोदावरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष होते.या संस्थेने अलीकडेच आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे.त्यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक,धार्मिक आणि लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

ह.भ.प.उद्धवजी महाराज मंडलिक

    यावर्षीही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यात हे प्रवचन संपन्न होणार आहे.या शिवाय शुक्रवार दि.१९ जून रोजी नाशिक येथील पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांचे,’जीवनातील संस्कारांचे महत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.या शिवाय प्रसिद्ध गीतकार आणि लेखक प्रा.प्रवीण दवणे यांचे,नवीन पिढी घडवताना’ या विषयावर शनिवार दि.२० जून रोजी व्याख्यान आयोजित केले आहे.या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ हे राहणार आहे.तरी या कार्यक्रमासाठी संवत्सर सह कोपरगाव,राहाता तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संवत्सर येथील माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close