आरोग्य
कोपरगावात विविध कार्यालयांना कोरोना संरक्षक साहित्य वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात इफको कंपनी व कोपरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (एम.पी.सोसायटी) यांच्या वतीने अत्यावश्यक सेवा देणारे वीज वितरण,भारतीय डाक कार्यालय,वन विभाग, सामाजिक वनीकरण, पेट्रोल पंप अधिकारी आणि कर्मचारी यांना डेटाँल साबण,रुमाल (मास्क) आदी साहित्याचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देशातील अग्रगण्य खत उत्पादक कंपनी इफको आणि कोपरगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.(एम.पी.सोसायटी)यांचे संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्ग विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन अभियान अंतर्गत वीज वितरण कोपरगांव शहर व ग्रामीण भागातील अधिकारी व कर्मचारी,तसेच भारतीय डाक विभाग, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांनी डेटाँल साबण,मास्क व इतर सामुग्री देण्यात आली आहे.या उपक्रमात इफकोचे श्री. देसाई व एम.पी.सोसायटीचे अध्यक्ष वैभवराव आढाव यांचे सहकार्य लाभले आहे.
प्रातिनिधिक स्वरुपात वीज वितरण कर्मचारी यांना कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे,यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी कोपरगांव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल कटके,आपत्कालीन सेवा समन्वयक सुशांत घोडके,तुरुंग अधिकारी रविंद्र देशमुख,वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तात्रय गोर्डे, तंत्रज्ञ संजय राठोड,सुनील दळवी सह वीज वितरण कर्मचारी बहू संख्येने उपस्थित होते.