जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सामग्री द्या-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जागतिक कोरोना साथीच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांसाठी आवश्यक साधन सामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

भारतात आतापर्यंत ११९० लोकांना कोरोनोची लागण झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत. पण हे नागरिकच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे सरकारने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काही दिवसात भारतातील गावं कोरोना विषाणूची केंद्र बनतील असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी हि मागणी केली आहे.

हि मागणी करताना त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात सर्वत्र जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून व कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाय योजना प्रभावीपणे राबवित असल्यामुळे अद्यापपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.मात्र येत्या काही दिवसात हि परिस्थिती अशीच राहील हे सांगणे अवघड आहे.त्यामुळे जर मतदार संघात भविष्यात कोरोना बाधित रुग्ण आढळले तर आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांसाठी आवश्यक साधन सामग्रीसह सज्ज असणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यासाठी या रुग्णालयांना ४२ इन्फ्रारेड थर्मामीटर,१००० पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स,५ बेडसाठी आय.सी.यू .व्हेंटिलेटर व आयसोलेशन वार्ड, अतिदक्षता विभाग यंत्रणा यामध्ये मॉनिटर, व्हेंटिलेटर,सक्शन मशीन,हाऊलर बेड्स,सिरीज पंप,डिफिब्रिलेटर व एअरकंडिशनर तसेच १००० फेस मास्क(एन -९५),२००० हात मोजे आदी साधन सामुग्रीची मागणी करण्यात आली आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये कोरोना व्हायरसचा उदभवणारा संभाव्य धोका ओळखून तात्काळ आवश्यक असलेली साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close