जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आईनेच प्रियकराच्या सहाय्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार,आरोपी अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

शिर्डी-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मनेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीस वेस-सोयगाव येथील प्रियकरासमवेत शारीरिक संबंध ठेण्यास बाध्य केल्याने व हा प्रकार सदर मुलगी आणि तिचा मामेभाऊ यांनी उघड केल्याने सदर महिला तिच्या प्रियकरास राहाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेने वेससह कोपरगाव-राहाता तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या बाबत अशी माहिती मिळते की”अ.नगर जिल्ह्यातील एक समाज असा असून त्यात मुला-मुलीचे विवाह वयात आल्यावर करतात.मुलींना विवाह करण्याचे अथवा न करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.त्या वेश्या व्यवसाय देखील त्या करू शकतात.या समाजातील स्रिया नृत्य,गायन व तमाशा यांमध्ये काही स्त्रिया भाग घेतात.अलीकडील काळात या समाजात बऱ्या पैकी जागृती आणि शिक्षण यांचा वारा लागला आहे.त्यामुळे या प्रथा नष्ट होत आहे हि समाधानाची बाब आहे.

‘आई’ म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय.मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते.आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते.आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना या जगात केली जाऊ शकत नाही.आपल्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलीला अथवा मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते.मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही असते याबाबत गावोगाव कीर्तनकार जागृती करत असतात.मात्र या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी घटना नुकतीच उघड झाली असून या ‘आई’ नावाला काळींबा ठरलेल्या मनेगाव येथील एका आईला आणि तिच्या वेस येथील प्रियकराला राहाता तालुक्यातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील मनेगाव येथील शिक्षण घेणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चक्क तिच्या जन्मदात्या आईने सांगितले की,” तुला आरोपी भडांगे (रा.वेस.ता.कोपरगाव) नामक इसमा सोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील.आईच्या या अजब सूचनेला आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला शिक्षणामुळे बऱ्यापैकी जाणीव झाल्याने तिने या कृत्यास ठाम विरोध करत स्पष्ट नकार दिल्याने मोठा पेच उभा राहीला होता.मुलीने नकार देताच आईने मुलीला दटावत,”आपल्या समाजात हि प्रथा असल्याने असे तुला असे करावेच लागत असते”,”तू जर असे केले नाही तर,तुझ्याकडे पहावे लागेल” असे म्हणून चक्क दम भरला व बळजबरीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला आरोपी भडांगे नावाच्या इसमाच्या ताब्यात दिले व ती अल्पवयीन असल्याची माहिती असून सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध घरातील एका खोलीत नेऊन आरोपीने दुष्कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली होती.त्यामुळे कोपरगाव-राहाता तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या वतीने तिचा मामेभाऊ याने वेळीच सावधपणा दाखवत राहाता पोलिस ठाण्याला १६ सप्टेंबर रोजी मुलीच्या वतीने फिर्याद दाखल केली आहे.व आरोपींवर गुन्हा रजिस्टर नोंदी क्रं. ४०७/२०२२ भा.द.वि.कलम ३७६ (२)( आय )( जे ) ५०६,३४ बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा कलम ४,६,१६,१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी भडांगे आणि मुलीची आई या दोघांना राहाता पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close