जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोयटे विद्यालयाला वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

स्व.लक्ष्मीनारायण झंवर यांच्यात असणारी सामाजिक कार्याविषयीची सेवाभावी वृत्ती आजही त्यांच्या कुटुंबात दिसून येत असल्याचे प्रतिपादन राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव शहरात ५ वॉटर फिल्टर प्लॅन्ट बसविले असून आज निवारा परिसरातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात ६ वा वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करून आपल्या वडिलांचा कोपरगाव वासियांना स्वच्छ पाणी देण्याचा संकल्प त्यांच्या स्मरणार्थ करत आहे”- डॉ.जगदीश लक्ष्मीनारायण झंवर,कोपरगाव.

स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाला स्व.लक्ष्मीनारायण सवाईराम झंवर यांच्या स्मरणार्थ श्री जगदीश झंवर व संगीता झंवर यांनी कोयटे विद्यालयाला वॉटर फिल्टर प्लॅन्ट देण्यात आला.त्या प्रसंगी ते बोलत होते.

सदर द्वारकानाथ मुंदडा,नारायण भट्टड,श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीमती पुष्पलता सुतार,सेवानिवृत्त शिक्षिका वाणी मॅडम,जोशी,ज्येष्ठ नागरिक द्वारकानाथ मुंदडा,नारायण भट्टड, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीमती पुष्पलता सुतार,सेवानिवृत्त शिक्षिका वाणी मॅडम,जोशी मावशी आदींप्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी डॉ.झंवर पुढे बोलताना ते म्हणाले की,”२५ वर्षापासून निवारा परिसरात विद्या दानाचे महत्त्वपूर्ण काम कोयटे विद्यालयाच्या माध्यमातून ओमप्रकाश कोयटे आणि सुहासिनी कोयटे आणि सेवाभावी वृत्तीच्या शिक्षिकांना सोबत घेऊन करत आहे ही खूप अभिमानाची बाब असून त्यांच्या सामजिक कार्यात झंवर कुटुंबाचा खारीचा वाटा म्हणून शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने झंवर परिवाराकडून वॉटर फिल्टर प्लॅन्ट प्रदान करण्यात आला. या प्लॅन्टमधून वातावरणाप्रमाणे मुलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.
प्रसंगी निवाऱ्यातील ज्येष्ठ नागरिक द्वारकानाथ मुंदडा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. कोयटे विद्यालयाचे संस्थापक काका कोयटे व सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते डॉ.जगदीश झंवर व संगीता झंवर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोयटे म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून निवारा परिसरात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सेवाभावी वृत्तीचे काम आम्ही करत आहोत. जे विद्यार्थी हे फी भरू शकत नाही किंवा कमी प्रमाणात फि भरू शकतात त्या विद्यार्थ्यांनाही आम्ही आमच्या शाळेत प्रवेश देऊन शिक्षण देण्याचे काम करत आहोत.यामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षिकांचेही तितकेच महत्त्वाचे योगदान आहे.कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक,शैक्षणिक कार्यात स्व.लक्ष्मीनारायण झंवर यांच्यासोबत असताना त्याची समाजाला काही तरी देण्याची वृत्ती त्यांचा मुलगा जगदीश आणि स्नुषा संगीता यांच्यामध्ये ही असल्याचे जाणवले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोयटे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ.नरेंद्र भट्टड, दिगंबर आप्पा लोहारकर,भालचंद्र विभूते,अरूण पिंपळवाडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष पोटे, ससाणे, खानापुरे आर.जी.तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका.तृप्ती कासार यांनी मानले.उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close