जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ट्रक अपघात,दुचाकीस्वार जागीच ठार,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि. मी.अंतरावर असलेल्या साई धाम कमानींजवळ नगर-मनमाड रस्त्यावर एक ट्रकने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत सचिन काशिनाथ रोहोम (वय-३०) रा.खिर्डी गणेश ता.कोपरगाव हा तरुण जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

संकल्पित छायाचित्र.

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची पुरती वाट लागली असल्याचे दिसून येत आहे.त्यातच हा पासून कमी प्रमाणात पडत असल्याने रस्त्यावर धूळ मिश्रीत गाळ साचून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे.त्यामुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.अशीच घटना कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि. मी.अंतरावर साई धाम कमानी नजीक दुपारी ३.४५ वाजता घडली असून त्या ठिकाणी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास उडवले आहे.त्यात सचिन रोहोम हा जागीच ठार झाला आहे.

वर्तमानात मान्सूनच्या पावसाने कहर केला असून त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांची पुरती वाट लागली असल्याचे दिसून येत आहे.त्यातच हा पासून कमी प्रमाणात पडत असल्याने रस्त्यावर धूळ मिश्रीत गाळ साचून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे.त्यामुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.अशीच घटना कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि.मी.अंतरावर साई धाम कमानी नजीक बनकर वस्तीजवळ दुपारी ३ वाजता घडली आहे.सदर मयत इसम हा आपली मुलगी कु.माहेश्वरी रोहोम हि उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केलेली होती.तिला भेटण्यासाठी शिर्डी येथील रूग्णालयात भेटण्यासाठी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरून निघून जात असताना घटनास्थळी दुपारी ०३ वाजता असताना त्या ठिकाणी भरधाव वेगाने मागून येणाऱ्या कंटेनरने (क्रं.यू.पी.७८ डी, एन.९०९१) याने येवला ते कोपरगाव रस्त्याने दुचाकी हिरो होंडा सी.डी.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ ए.एल.२९७५) स्वारास मागील बाजूने जोराने धडक देऊन उडवले आहे.त्यात तो जागीच ठार झाला आहे.कंटेनर चालक हा कोणतीही खबर ने देताच निघून गेला आहे.घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन अपघात ग्रस्त इसमास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथील वैद्यकीय उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आणि भेट दिली आहे.मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.

या प्रकरणी फिर्यादी चुलत भाऊ महेश हरिभाऊ रोहोम (वय-२५) रा.खिर्डी गणेश यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.२१९/२०२२ भा.द.वि कलम ३०४,(अ) २७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ)(ब) १७७ प्रमाणे दाखल केला आहे.घटनास्थळी भेट देऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close