जाहिरात-9423439946
विशेष दिन

कोपरगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तहसील कार्यालयाच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्‍ताक दिना निमित्त ध्वजारोहन मोठ्या उत्साहात तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्‍या हस्‍ते व आ.आशुतोष काळे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्‍यात आले आहे.

   भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर,इ.स.१९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

सदर प्रसंगी स्वातंत्र्य सैनिक उद्धवराव वाकचौरे यांच्या धर्मपत्नी द्रोपदाबाई वाकचौरे यांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.

या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.कोपरगाव तहसील कचेरीसह तालुक्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

      सदर प्रसंगी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी ध्वजारोहण केले आहे.त्यावेळी आ.आशुतोष काळेंसह राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे,माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,श्री.भोपे,उद्योजक कैलास ठोळे,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील गंगूले,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष कृष्णा आढाव,माजी नगरसेवक मंदार पहाडे,शैलेश साबळे,दिनकर खरे,वैभव आढाव,फकीर कुरेशी आदिसंह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

   दरम्यान कोपरगाव पंचायत समितीत गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी ध्वजारोहण केले आहे.त्यावेळी आ.आशुतोष काळे यासंह त्यांचे कार्यकर्ते,पंचायत समिती विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर प्रसंगी आ.काळे यांनी माजी खा.शंकरराव काळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे.

सदर प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप,उप अभियंता संतोष दळवी,प्र.गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख,प्रभारी महिला बालविकास अधिकारी पंडित वाघेरे,सहाय्यक लेखा अधिकारी गणेश सोनवणे,प्रशासन अधिकारी चिमाजी गोडे,संतोष नलगे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी आत्मा मलिक क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांकडून लक्षवेधी पथसंचलन करण्यात आले आहे.

दरम्यान शहर आणि तालुक्यात विविध शैक्षणीक संस्था,सहकारी संस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न आला आहे.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती जबाबदार अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close