कोपरगाव तालुका
पोहेगावात बुधवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्याचे माजी आ.अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर प्रतिष्ठान व मॅग्नम हॉर्ट इंस्टीट्युट यांचे संयुक्त विद्यमाने पोहेगाव येथे बुधवार दिनांक २१ ऑगष्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडुन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरामध्ये मोफत ई.सी.जी. व रक्त शर्करा (शुगर) तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीराचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. रुग्णांची नोंदणी शिबीरस्थळी सकाळी ९.०० वाजता करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांच्या इतर तपासण्या व उपचार वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथे सवलतीच्या दरात केल्या जाणार आहे. रुग्णांनी तपासणीसाठी येतांना आपली जुनी फाईल व तपासणी रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक असून या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.