जाहिरात-9423439946
खेळजगत

तलवारबाजी स्पर्धेत पार्थ साळुंकेला सुवर्ण पदक

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या सबज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी पार्थ महेश याने ‘इपी’ या वैयक्तीत प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पार्थने साखळी पध्दीतीचे संपुर्ण सामने जिंकुण बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे.यामध्ये त्याने भंडारा, मुंबई, औरंगाबाद या खेळाडुंना नमवुन अंतिम फेरीत सोलापुरच्या खेळाडुला १०-६ ने मात करून सुवर्ण पदक पटकाविले. त्याची रायपुर छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. पार्थच्या या यशाबद्दल संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण, सर्व विश्वस्त, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे. के. दरेकर आदींनी अभिनंदन केले आहे. या यशस्वी खेळाडुला तलवारबाजीचे शिक्षक शिवप्रसाद घोडके, गणेश वाकचौरे, योगेश बिडवे व अनुप गिरमे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close