कोपरगाव तालुका
चंद्रभागाबाई सोनवणे यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या मोहिनीराजनगर येथील रहिवासी असलेल्या चंद्रभागाबाई रामभाऊ सोनवणे (वय-९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात चार मुली,तीन नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव शहरात शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर गोदावरीतीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्या कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या चुलती होत्या.