जाहिरात-9423439946
कृषी विभाग

शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण करावी-…यांचे आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी हंगामाची ई-पिक पाहणी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यावर करण्याची सुविधा दिली आहे,ज्यामुळे पारदर्शकता येते आणि काम सोपे होते.
या योजने शेतकरी स्वतः आपल्या पिकांची अचूक माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवू शकतात.

   ‘माझी शेती,माझा सातबारा,मीच नोंदवणार माझा पीक पेरा’ हे ब्रीद ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाचे आहे,ज्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यावर करण्याची सुविधा दिली आहे,ज्यामुळे पारदर्शकता येते आणि काम सोपे होते.
या योजने शेतकरी स्वतः आपल्या पिकांची अचूक माहिती (पेरा,बांधावरील झाडे,चालू पड) सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवू शकतात.यासाठी ‘ई-पीक पाहणी’ नावाचे एक अँड्रॉइड मोबाईल ॲप वापरले जाते,जे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते.यामुळे तलाठ्याला ऑनलाइन माहिती मिळते आणि पीक पाहणीची प्रक्रिया जलद होते.

दरम्यान आज सकाळी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अपर व कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी कोपरगाव तालुक्यातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना इ पिक पाहणीचे प्रात्यक्षिक दाखवले आहे.

दरम्यान आज सकाळी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अपर व कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे,सोनेवाडी, देर्डे कोऱ्हाळे,मढी बुद्रुक आदी गावाना भेटी देऊन ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक व शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या पिकांची मोबाईल द्वारे पीक पाहणी करणेबाबत सूचना दिल्यात व पीक पाहणी शेतात जाऊन कशी केली पाहिजेत याचे प्रात्यक्षिक यावेळी शेतकरी, खातेदार आदींना दाखविले असल्याचे दिसत आहे.

    त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना,अनुदान वाटप,आपत्तीसंबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसह पीकविमा,पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होवू शकतात.त्यामुळे ई-पीक पाहणी करणे अत्यंत गरजेची आहे. ई-पीक पाहणी ‘डीसीएस’ मोबाईल ॲपच्या सहाय्याने रब्‍बी हंगामात ई-पीक पाहणी करण्याची मुदत १४ जानेवारी पर्यंतच होती. परंतु काही शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करणे बाकी असल्यामुळे ई-पीक पाहणी करण्यासाठी २४ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.    

 

    त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची अद्याप ई-पीक पाहणी करणे बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास संबंधित गावचे तलाठी, कोतवाल तसेच संबंधित गावात नियुक्त केलेले कृषी सहायक यांची मदत घेऊन आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी.ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंदणी न केल्यास सात-बारावर पीक पेरा कोरा राहील,जो नंतर भरता येत नाही. त्यामुळे पीक विमा व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळवण्यास अडचण निर्माण होईल.ऐनवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती याबाबत पीक विमा मिळण्यासाठी सातबारावर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी रब्बी पिकांची व फळपिकांची नोंदणी करून घ्यावी.ई-पीक पाहणीसाठी दिलेल्या मुदतीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी घाई करून नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close