जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवली दीड कोटी रुपयांची शिष्यवृत्ती !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती ( एन.एम.एम.एस.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे १५९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राज्यात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आठव्यांदा आत्मा मालिक ने मिळवला असल्याचा दावा संस्थेने केला आहे.या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये अशी पाच वर्षांमध्ये प्रत्येकी ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.१५९  विद्यार्थ्यांना ९५ लाख ४० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

आज पर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून आत्मा मालिकच्या १२९३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून साडेसहा कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे. तसेच १६६  विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असून  त्यांना एकूण ६३ लाख ७४  हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन,तयारीसाठी ज्यादा वर्ग,दैनंदिन चाचण्या,सराव चाचण्या जोडीला विद्यार्थी व शिक्षकांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. मिशन गरुडझेप वर्षभर राबविल्याने हे उद्दिष्ट साकार झाले असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी आमच्या प्रतिनिधोशी बोलताना सांगितले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख रवींद्र देठे,सचिन डांगे,सागर अहिरे,अनिल सोनवणे,रमेश कालेकर, मीना नरवडे,विषय शिक्षक सुनील पाटील,राहुल जाधव, राजेंद्र जाधव,नितीन अनाप,बाळकृष्ण दौंड,पुनम राऊत,अनिता कोल्हे,नयना आदमाने,किशोर बडाख,शेळके सोपान, संतोष भांड,सचिन जगधने,देठे आशा,जावळे अश्विनी, भुजाडे सर्जेराव,लोंढे वनिता,सातव मीना,जपे बबन, कराळे बाळासाहेब,कराळे सुनंदा,पिंगळे राजश्री,कहांडळ संजय,शिवम तिवारी,बेलोटे मिना,सोमासे वर्षा,मस्के ज्ञानेश्वर,गाढे रूपाली,गणेश कांबळे,वायखिंडे पांडुरंग,पोतदार,प्रतीक्षा शिंदे संदीप यांचे मार्गदशन लाभले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त  प्रकाश भट,प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,प्रभाकर जमधडे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close