गुन्हे विषयक
…’त्या’ महिलेचा मृत्यू,तीन जणांवर गुन्हा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 122/1 मधील विहिरीत विवाहित महिला जयश्री संदीप डांगे (वय -35) हिचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मयत महिलेचे वडील बाळासाहेब कचरू थोरात याचे फिर्यादीवरून मयत महिलेचा पती संदीप डांगे,सासरा नानासाहेब डांगे व सासु विमलबाई डांगे याचे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती हाती आली आहे.

“आपल्या मुलीची सासु नेहमी मुलगी जयश्री डांगे हीचे सोबत भांडण करायची,तीचा पती संदिप डांगे हा तीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तीस मारहाण करुन रात्रीच्या वेळी घरातुन हाकलुन द्यायचे.परिणामी त्यांचे जाचाला,मानसिक त्रासाला कंटाळुन माझी मुलगी जयश्री संदिप डांगे हिने दि. 05मे रोजी सकाळी 08 वाजेपुर्वी त्यांचेच घराचे बाजुला असलेली विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सदर महिला जयश्री बाळासाहेब थोरात हिचा विवाह सन-2012 साली जवळके येथे होऊन तिला शहापूर येथील संदीप डांगे या तरुणाशी लावून देण्यात आला होता.दरम्यान त्यांना वर्तमानात एक 11 वर्षाचा मुलगा आणि एक 09 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.काल ती तिच्या बहिणीचे 08 मे रोजी लग्न असल्याने पुऱ्या करण्यासाठी आपल्या माहेरी आली होती.विवाहपूर्व शेवंती पुऱ्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास वडिलांनी तिला दुचाकीवर जाऊन आपल्या सासरी शहापूर येथील वस्तीवर सोडून दिले होते.त्यावेळी संबंधित मयत महिलेने नेलेल्या पुऱ्या सासरच्या लोकांनी फेकून दिल्या होत्या अशी माहिती हाती आली आहे.त्यानंतर सदर महिलेचे वडील घरी आले होते.त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी या घटनेची माहिती मिळाली होती.

दरम्यान शिर्डी पोलिसांनी खबर मिळताच घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेचा ग्रामस्थानी विहिरीच्या बाहेर काढलेला मृतदेह त्यानंतर ताब्यात घेऊन आधी राहाता आणि नंतर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेला होता.त्यानंतर त्याच दिवशी रात्री मयत महिलेचे वडील बाळासाहेब कचरू थोरात यांनी मुलगी( जयश्री संदिप डांगे वय 35 वर्षे) हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा पती संदीप डांगे हा तिला सुमारे सात ते आठ वर्षापासुन हा दारु पिवुन शिविगाळ, मारहाण करत होता.तसेच तीचे सासरे नानासाहेबव डांगे व सासु विमलबाई डांगे यांनी सुद्धा तीला तीचे पतीसोबत साथ देवुन तीस मारहाण,शिविगाळ व मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप केला आहे.त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की,”आपल्या मुलीची सासु नेहमी मुलगी जयश्री हीचे सोबत भांडण करायची, तीचा पती संदिप डांगे हा तीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तीस मारहाण करुन रात्रीच्या वेळी घरातुन हाकलुन द्यायचे.परिणामी त्यांचे जाचाला,मानसिक त्रासाला कंटाळुन माझी मुलगी जयश्री संदिप डांगे हिने दि. 05मे रोजी सकाळी 08 वाजेपुर्वी त्यांचेच घराचे बाजुला असलेली विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.325/2026 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 108,1115(2),352,351(1),3(5) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल जोराने हे करत आहेत.



