महसूल विभाग
जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात,नागरिकांना केले आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात १ मेपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून, कोपरगाव तहसील प्रशासनाने या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण केली आहे.यंदा प्रथमच नागरिकांना ‘स्वगणना’ (Self Enumeration) या माध्यमातून स्वतःची माहिती ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांनी या पोर्टलचा वापर करून आपली नोंदणी पूर्ण करावी,असे आवाहन कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.

“देशाच्या सामाजिक,आर्थिक आणि भौगोलिक विकासाचा पाया मानली जाते.शासनाच्या विविध योजना,पायाभूत सुविधा, आरोग्य,शिक्षण,रोजगार यांसारख्या क्षेत्रांतील नियोजनासाठी जनगणनेतील आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे आवश्यक आहे.डिजिटल इंडिया उपक्रमाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असून,नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वगणनेला प्राधान्य द्यावे”-प्रफुल्लता सातपुते,नायब तहसीलदार.
कोरोना महामारीमुळे काही वर्षे लांबणीवर पडलेली जनगणना यंदा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत आहे.माहिती संकलनाची प्रक्रिया अधिक पारदर्शक,अचूक आणि वेळेची बचत करणारी ठरावी,यासाठी केंद्र सरकारने स्वगणनेचे पोर्टल विकसित केले आहे.या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या सहाय्याने आपली माहिती भरता येणार आहे.
(https://se.census.gov.in) या लिंक द्वारे माहिती भरता येणार आहे)
कोपरगाव शहर तसेच ग्रामीण भागात १६ मे पासून प्रगणक घरोघरी भेट देणार आहेत. मात्र, त्याआधी नागरिकांनी स्वतःहून स्वगणना पूर्ण केल्यास पुढील प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.दिनाक १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक नागरिकांच्या घरी येतील. त्या वेळी नागरिकांनी स्वगणना केल्यास केवळ SEID क्रमांक सादर केल्यावर जनगणना प्रक्रिया त्वरित पूर्ण होणार आहे.त्यामुळे नागरिक आणि प्रगणक या दोघांचाही वेळ वाचणार असून,कामकाज अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

या मोहिमेअंतर्गत कोपरगाव तहसील प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.एकूण ४०२ प्रगणक आणि ६७ पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून,त्यांना डिजिटल प्रणाली हाताळण्याचे तसेच नागरिकांशी संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.प्रत्येक प्रगणकाला ठरावीक क्षेत्र दिले असून,संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाणार आहे.
या मोहिमेअंतर्गत कोपरगाव तहसील प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.एकूण ४०२ प्रगणक आणि ६७ पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून,त्यांना डिजिटल प्रणाली हाताळण्याचे तसेच नागरिकांशी संवाद साधण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.प्रत्येक प्रगणकाला ठरावीक क्षेत्र दिले असून,संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाणार आहे.
जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून,देशाच्या सामाजिक,आर्थिक आणि भौगोलिक विकासाचा पाया मानली जाते.शासनाच्या विविध योजना,पायाभूत सुविधा, आरोग्य,शिक्षण,रोजगार यांसारख्या क्षेत्रांतील नियोजनासाठी जनगणनेतील आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरते.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे आवश्यक आहे.डिजिटल इंडिया उपक्रमाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असून,नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वगणनेला प्राधान्य द्यावे,असे आवाहन नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते यांनी केले आहे.
दरम्यान नागरिकांनी दिलेल्या माहितीत अचूकता राखावी आणि दिलेल्या कालावधीत स्वगणना पूर्ण करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.एकूणच,जनगणना प्रक्रिया सुरळीत,जलद आणि अचूक पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, कोपरगावकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची अपेक्षा नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी व्यक्त केली जात आहे.



