जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…हे विद्यार्थी झाले पोलिस उपनिरीक्षक ! सर्वत्र अभिनंदन

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण ग्रामीण भागातील रहिवासी असूनही केवळ जिद्दी आणि चिकाटी या गुणाच्या जोरावर रांजणगाव देशमुख येथील साईनाथ चिमाजी वर्पे यांने व मनेगाव येथील विद्यार्थी अनिल हिरालाल गांगवे, माळेगांव थडी येथील अनिकेत संज्या वाबळे आदी तिन विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न पूर्ण करून पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून नवीन पिढीस प्रेरणा दिली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थी.

साईनाथ वर्पे   अनिकेत वाबळे   अनिल गांगवे               

दरम्यान याच तालुक्यातील मळेगांव थडी येथील रहिवासी अनिकेत संजय वाबळे याचे वडिलांचे लहानपणीच अपघातात निधन झाले असताना त्यांचा सांभाळ त्याचे मामा गणेश रावसाहेब राजोळे यांनी केला होता.त्याने कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षण घेऊन आपले स्वप्न प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले आहे.यांचेसह तिन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर झाला आहे.मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यंदा कट-ऑफ विक्रमी लागल्याने परीक्षेतील स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.यावेळी हा निकाल जाहीर करण्यासाठी आयोगाने बराच वेळ घेतला आहे.तब्बल साडे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.ही परीक्षा दिलेले उमेदवार आता पुढील तयारीला लागू शकतात.त्याला कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील रांजणगाव देशमुख येथील विद्यार्थी साईनाथ वर्पे व मनेगाव अनिल गांगवे अपवाद नाही.गांगवे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे.गांगवे यांने सन-२०१७ मध्ये कोपरगाव येथील के.जे.सोमैया येथील महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केल्यावर नाशिक येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या प्रवासाला नवी दिशा मिळाली होती.

   दरम्यान साईनाथ वर्षे हा विद्यार्थी २०१४ मध्ये अहमदनगर पोलीस दलात भरती झाला होता.पोलीस दलात सेवा बजावत असतानाच त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि २०१९ पासून विभागीय परीक्षेची तयारी सुरू केली होती.नोकरीची खडतर जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले होते.सन -२०२२ मध्ये त्यांनी पूर्व, मुख्य आणि शारीरिक चाचणी अशा तिन्ही टप्प्यांवर यश मिळवले होते,मात्र अंतिम निवड यादीत त्यांचे नाव काही गुणांनी राहून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता.मात्र,खचून न जाता त्यांनी २०२३ मध्ये पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली आणि यंदा शारीरिक चाचणीत १०० पैकी १०० गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरीसह आपले नाव निवड यादीत कोरले आहे. त्यांच्या या यशात आई-वडील,पत्नी सोनाली वर्षे यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे गौरवाने सांगितले आहे.एस.के.फिटनेसचे मार्गदर्शक सागर गावकर यांचे त्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.दोन्ही विद्यार्थ्यांनी दुष्काळी भागातील असतानाही आपली कर्तव्यनिष्ठा,प्रामाणिकपणा,तळमळ आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर त्यांनी पोलीस दलात स्वतंत्र ओळख निर्माण केली.याच जिद्दीच्या बळावर त्यांनी एम.पी.एस.सी.विभागीय परीक्षेत मोठे यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यश संपादन केले आहे.

   दरम्यान याच तालुक्यातील मळेगांव थडी येथील रहिवासी अनिकेत संजय वाबळे याचे वडिलांचे लहानपणीच अपघातात निधन झाले असताना त्यांचा सांभाळ त्याचे मामा गणेश रावसाहेब राजोळे यांनी केला होता.त्याने कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षण घेऊन आपले स्वप्न प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले आहे.शिक्षणानंतर त्याने आधी सन-2021 साली पोलिस कॉन्स्टेबल पदावर भरती होत आपले काम करत हे यश संपादन केले आहे.त्याचा लहान भाऊ पोलिस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे.

  दरम्यान या तिन्ही विद्यार्थ्यांचे या लक्षवेशी यशाबद्दल कोपरगाव तालुक्यासह मनेगाव,रांजणगाव देशमुख,कोळगाव थडी,जवळकेसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close