निधन वार्ता
भागीरथी सिनगर यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील रहिवासी व कार्यकर्ते भगवान परशराम सिनगर यांच्या मातोश्री भागीरथी परशराम (वय-९२) यांचे काल रात्री ११ मे रोजी रात्री ९.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात ०४ मुले ०३ मुली,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

स्व.भागीरथी सिनगर या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून आप्त स्वगणात आणि भोजडे,दहीगाव बोलका,धोत्रे परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीचे २०२१ साली निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.भागीरथी सिनगर या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून आप्त स्वगणात आणि भोजडे,दहीगाव बोलका,धोत्रे परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीचे २०२१ साली निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.अत्यंत प्रतिकूल काळात त्यांनी आपल्या कुटुंबाची धुरा पेलली होती.त्यांची प्रकृती अलीकडील काळात बिघडली होती.त्यांचे सोमवार दि.११ मे रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले आहे.त्यांच्यावर भोजडे येथील सिनगर वस्तीवर आज सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने भोजडे आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्या साहेबराव सिनगर,बाजीराव सिनगर,विजय सिनगर यांच्या मातोश्री होत्या.
भागीरथी सिनगर यांचे निधनाबद्दल ह.भ.प.परशुराम महाराज अनर्थे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,आ.विवेक कोल्हे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.


