दळणवळण
…या महामार्गावरील पुलाचे काम जलद पूर्ण करा-सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील जुन्या मुंबई-नागपूर (एन.एच.७५२आय.) महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अतिशय धीम्यागतीने सुरु आहे.पावसाळा तोंडावर येवून ठेपला असतांना हे काम संथगतीने सुरू असून ते वेळेत पूर्ण करा अशी सूचना कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केली असल्याचे उघड झाले आहे.

जुना मुंबई नागपूर हा महामार्गावरील पूल नादुरुस्त झाला असल्याने परिणामी प्रवासी वाहनांना अन्य एम.आय.डी.सी.-मनाई मार्गे हा आदिवासी वस्तीसाठी तयार केलेला रस्ता वापरावा लागत आहे.तो रस्ता जास्त दिवस वापरता येणारं नाही कारण काही आठवड्यावर पावसाला येऊन ठेपला आहे.आणि त्या रस्त्यावरील पूल छोटे छोटे असल्याचे व शेवटी गोदावरी नदीला मिळत असल्याने त्यांची क्षमता मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ही वाहतूक लवकरच बंद करावी लागणार आहे.मात्र याची कोणतीही काळजी बांधकाम विभाग आणि राज्य राज्यकर्त्यांना दिसून येत नाही
कोपरगाव तालुक्यातील ईशान्येकडील कोपरगाव-वैजापूर आणि जुन्या नागपूर रस्त्याला जोडणारा आणि संवत्सर,कान्हेगाव,वारी,भोजडे,धोत्रे गावातील दळणवळणासाठी महत्वाचा ठरणारा श्री साईबाबा कॉर्नर,संजीवनी कारखाना ते संवत्सर या मार्गाची पुरती वाट लागली आहे.म्हणून अवजड वाहनधारक आदिवासींसाठी बनवलेल्या व औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा वापर करत असल्याने मनाई वस्ती रस्त्याची पुरती वाट लागली असून त्यात अपघात होऊन त्यात दशरथवादी येथील युवक सनी वाघ हा गंभीर जखमी झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थानी आणि तहसीलदारांना जाब विचारला असून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे हे महत्वाचे मानले जात आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,” मागील काही महिन्यांपासून या मुंबई-नागपूर महामार्गाच्या लगत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.कोपरगाव शहराला जोडणारा तालुक्याच्या पूर्व भागातील हा अतिशय महत्वाचा मार्ग बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.सदरचा रस्ता हा सन-1995 साली युती शासनाच्या काळात नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी रस्त्यासह पूल पूर्ण केला होता.त्याला अवघ्या तीस वर्षात भगदाड पडले आहे.परिणामी गेल्या काही महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे.मात्र संजीवनी सहकारी साखर कारखान्यांमार्फत जाणारा हा रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे.त्यावरून प्रवासी वाहने आणि अवजड वाहनांनी चालणे आणि प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्य ठरत आहे.त्यातून अनेकांचे बळी गेले आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग साधा एक खड्डा उजविण्याचे पुण्य करायला तयार असल्याचे दिसत नाही हे विशेष ! परिणामी प्रवासी वाहनांना अन्य एम.आय.डी.सी,-मनाई मार्गे हा आदिवासी वस्तीसाठी तयार केलेला रस्ता वापरावा लागत आहे.तो रस्ता जास्त दिवस वापरता येणारं नाही कारण काही आठवड्यावर पावसाला येऊन ठेपला आहे.आणि त्या रस्त्यावरील पूल छोटे छोटे असल्याचे व शेवटी गोदावरी नदीला मिळत असल्याने त्यांची क्षमता मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ही वाहतूक लवकरच बंद करावी लागणार आहे.मात्र याची कोणतीही काळजी बांधकाम विभाग आणि राज्य राज्यकर्त्यांना दिसून येत नाही.या मर्यादित रस्त्यालाही संवत्सर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,माजी उपसरपंच विवेक परजणे,कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब बारहाते आणि ग्रामस्थानी विरोध केला असून तो रस्ता नादुरुत होत असल्याच्या तक्रारी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्याचे पडसाद आज उमटले असल्याचे दिसून आले आहे.त्यानंतर आ.काळे यांनी हे आदेश दिले असल्याचे मानले जात आहे.त्यांनी पर्यायी रस्ता त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे कामाला गती देवून पावसाळयापूर्वी पुलावरून वाहतूक सुरु करा अशा सूचना आ.काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.७५२ आय) च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.आता बांधकाम विभाग या आदेशाला किती गांभीर्याने घेतो की केराची टोपली दाखवतो हे लवकरच कळणार आहे.



