कोपरगाव तालुका
कोपरगांवातील…या बँकेस रूपये ३ कोटी ९७ लाखांचा ढोबळ नफा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांवसह अ.नगर,औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात सहकारी बँकात अग्रणी असलेल्या कोपरगांव पिपल्स को-ऑप.बँकेने याही वर्षी मार्च २०२३ या संपलेल्या आर्थिक वर्षात ढोबळ नफा ३ कोटी ९७ लाख रुपये प्राप्त केला असल्याची माहिती हाती आली आहे.
“बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालु असून अमृत महोत्सवी वर्षात बँकेने मोबाईल बँकींग सुविधा उपलब्ध करून दिली असून अन्य सुविधा देखिल नजिकच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार आहे”-कैलास ठोळे,अध्यक्ष,कोपरगाव को.ऑप.पीपल्स बँक.
बँकेने सन २०२२ २०२३ मध्ये वर्ष अखेरीस बँकेच्या आर्थिक परिस्थितीत भरघोस प्रगती करीत ठेवी रूपये २७५ कोटी ५९ लाख,कर्ज वाटप १६१ कोटी ०८ लाख,भागभांडवल ६ कोटी ५७ लाख,गुंतवणूक १४४ कोटी ०४ लाख,ग्रॉस एन.पी.ए. ६.३२%,नेट एन.पी.ए.०.६०%, इतका असून बँकेचा ढोबळ नफा ३ कोटी ९७ लाख झाला आहे व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू.२ कोटी ३७ लाख आहे.
बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लोहकरे यांनी सांगितले की,”सभासद,ठेवीदार,कर्जदार यांचे सहकार्याने बैंकने ७५ व्या वर्षात पदार्पन केले आहे.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार खात्यांची परवानगी घेऊन सभासदांना भेट पावती देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.या पार्श्वभुमीवर सेवक वर्गाने केलेल्या चांगल्या कामाची दखल व्यवस्थापनाने घेऊन सर्व कर्मचारी वर्गाला २०२२-२०२३ चा बोनस व सानुग्रह अनुदान म्हणुन दोन महिन्याचा पगार दिला आहे.
आतापर्यंत बँकेचे ठेवीदार,कर्जदार,खातेदार,सभासद व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. बँकेस सतत “अ” वर्ग प्राप्त असून बँक दरवर्षी १५% लाभांश देत असून याही वर्षी १५% लाभांश सभासदांना देण्याचा मानस आहे.यापुढेही संचालक मंडळ यशाची चढती कमान अशाच प्रकारे कायम ठेवील असा विश्वास बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे व संचालक मंडळ यांनी व्यक्त केला आहे.बँकेच्या या प्रगती मध्ये बँकेचे संचालक,व्यवस्थापक,अधिकारी,कार्मचारी आदींचे योगदान लाभले आहे.