शैक्षणिक
…या शाळांचा दहावी निकाल लागला,सर्वत्र अभिनंदन!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाने सलग २० व्या वर्षी १०० % निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

दरम्यान माहेगाव देशमुख येथील रहिवासी व गौतम पब्लिक स्कूलचे मराठी विभाग प्रमुख श्री पठाण सर यांची कन्या आणि कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी कु.माहीन नसिर पठाण हिने दहावी परीक्षेत ९७.००% गुण प्राप्त केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांचा दहावीचा निकाल २०२६ (10वीचा) निकाल आज ०८ मे रोजी दुपारी ०१ वाजता जाहीर झाला असून यात या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही यश संपादन केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अक्षय प्रकाश आवारे याने ९३.४० % गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून साहिल रतन जाधव याने ९०.६० % गुणांसह द्वितीय,तर वेदांत महेंद्र जाधव याने ९० % गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.तसेच मानस गोरख पाटील ८८.४० % आणि कार्तिक साहेबराव दाते ८७.६० % यांनी देखील विशेष प्राविण्य मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

न्यू इंग्लिश स्कूल काकडी विद्यालयाचा निकाल ९६.१५ टक्के
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल काकडी विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९६.१५ टक्के लागला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा रोवला आहे.
विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये साई गणपत गुंजाळ याने ८४.०० % गुण प्राप्त करून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला कु.सायली अशोक विघ्ने हिने ७९.६० % गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला, तर कार्तिक संदीप गुंजाळ याने ७९.२० % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

शिरसगावच्या श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के.
दरम्यान शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल हाती आला असून यात ६५ विद्यार्थांनी परीक्षा दिली होती ते सर्वांच्या सर्व उत्तीर्ण झाले असून निकाल १०० टक्के लागला आहे.यात तेजस अमोल घाटे याने ९४ टक्के गुण मिळवत पहिला तर कु.ऋतुजा गणेश गायकवाड हिने ९३.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तर कृष्णा जालिंदर काळे याने ९३ टक्के गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकावर सलामी दिली आहे.तर विशेष प्राविण्य श्रेणीत ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.तर ‘अ’ श्रेणीत ०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा दहावीचा निकाल हाती
दरम्यान कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा दहावीचा निकाल हाती आला असून तो ७९.९१ टक्के लागला आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांत साई नारायण कुलकर्णी याने ९७.००% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर वेदांत सचिन येवले – ९५.६०% गुण मिळवत द्वितीय दुसऱ्या स्थानावर आपला झेंडा रोवला आहे.तर पार्थ मच्छिंद्र लोहकणे याने ८६.६०% गुण मिळवून तृतीय स्थानावर विजयी सलामी दिली आहे.या शाळेतील विशेष प्राविण्य यादीत १३ विद्यार्थी चमकले आहे तर प्रथम श्रेणीत २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.तर द्वितीय श्रेणीत ८२ विद्यार्थी पात्र ठरले असून पास श्रेणीत ६० विद्यार्थ्यांनी स्थान राखले आहे.

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल’चे यश!
कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या ‘संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल’ने १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सलग १० वर्षे लक्षणीय यश मिळवले आहे.यात नारायणी नितीन शिंदे हिने ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर त्यापाठोपाठ आस्था किशोर देवडे हिने ८९ टक्के गुणांसह द्वितीय स्थानावर कब्जा केला आहे तर साईश्री गणेश कानडे हिने ८८.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले आहे.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचे आ.आशुतोष काळे,एस.जी.विद्यालयाचे कैलास ठोके,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रवर्तक केशव भवर,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदींनी अभिनंदन केले आहे.


