शैक्षणिक
…या विद्यालयात आषाढी दिंडी उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगांव -(प्रतिनिधी)
आषाढी एकादशीचे निमित्ताने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात’आषाढी वारी व साक्षरता दिंडी’ उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली असून त्यावेळी टाळ-मृदुंगाचा गजर, “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर विठ्ठलमय झाला होता.

आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी मान्यता आहे.ज्यामुळे चार महिन्यांच्या चातुर्मासाची सुरुवात होते.पंढरपूरमध्ये भीमा अर्थात चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले जाते.महाराष्ट्र आणि आता तर परदेशातूनही यासाठी दिंड्या येऊ लागल्या आहेत.हे धार्मिक संस्कार मराठी मनावर व्हावे यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या दिवशी या दिंड्यांचे आयोजन करून बाल मनावर संस्कार बिंबवले जातात.कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ‘आषाढी वारी व साक्षरता दिंडी’ उत्साहपूर्ण संपन्न झाली आहे.
आषाढी वारी हे महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख असून यादरम्यान लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी चालत जातात.आषाढी वारी पर्व वारकऱ्यांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान बाळगून आहे.विठू माउलीच्या नामाचा गजर करत संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूर गाठणे हे जीवनाचे ध्येय मानले जाते.आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी मान्यता आहे.ज्यामुळे चार महिन्यांच्या चातुर्मासाची सुरुवात होते.पंढरपूरमध्ये भीमा अर्थात चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले जाते.महाराष्ट्र आणि आता तर परदेशातूनही यासाठी दिंड्या येऊ लागल्या आहेत.हे धार्मिक संस्कार मराठी मनावर व्हावे यासाठी विविध शाळा आणि महाविद्यालयात आषाढी एकादशीच्या दिवशी या दिंड्यांचे आयोजन करून बाल मनावर संस्कार बिंबवले जातात.कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात ‘आषाढी वारी व साक्षरता दिंडी’ उत्साहपूर्ण संपन्न झाली आहे.विद्यालयातून निघालेली दिंडी श्रीराममंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली.वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.दिंडीतून भक्तीबरोबरच साक्षरतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन अतुल कोताडे यांनी केले होते.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे,कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,खजिनदार आनंद ठोळे, सदस्य डॉ.अमोल अजमेरे,राजेश ठोळे,संदीप अजमेरे,दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले व विद्यार्थ्यांचे स्वागत केलं आहे.
सदर प्रसंगी मुख्याध्यापक सुरेंद्र शिरसाळे,पर्यवेक्षक बलभीम उल्हारे यांच्यासह संजय बर्डे,शितल अजमेरे,संजीवनी डरांगे,रूपाली साळुंखे,श्रीमती स्वाती जाधव,पल्लवी तुपसैंदर,छाया निंबाळकर,योगेश गवळे,दिगंबर देसाई,सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे.



