जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अखेर…’ ती ‘ कंपनी बंद करण्याचे आदेश,शेतकऱ्यांनी केला जल्लोष !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव (नानासाहेब जवरे)

   कोपरगाव आणि येवला तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या नाटेगाव,बदापूर,नांदेसरसह सहा गावातील भूजल प्रदूषित करून कृषीक्षेत्र उध्वस्त करणाऱ्या मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेती क्षेत्रात सोडण्यात येणाऱ्या सांड पाण्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले होते.सदरचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित असल्याचे उघड झाल्याने या गावातील शेतकरी संघटनेने सदर कंपनी बंद करावी अशी मागणी केली होती.त्या मागणीला यश आले असून नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन उपक्रम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहे.तसे न केल्यास,जल अधिनियम १९७४ आणि हवा अधिनियम १९८१ च्या तरतुदींनुसार तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मंडळाकडे कोणताही पर्याय राहणार नाही अशी सक्त ताकीद प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेने समाधान व्यक्त केले असून अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

“दरम्यान याबाबत प्रदूषण महामंडळाचे हा प्रकल्प बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता,महावितरण येवला यांना आणि नांदूर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासन आदींना सदर उद्योगाचा वीज पुरवठा पाणी पुरवठा तातडीने खंडित करण्याचे व या कार्यालयाला तसे कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.मात्र अद्यापही नाशिक जिल्ह्यातील काही राजकीय नेते या कंपनी प्रशासन आणि मालकाला अभय देत असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली असून संबंधित येवला आणि नाशिक जिल्ह्यातील नेते आणि पुढाऱ्यांनी या मर्केट लीला बंद कराव्या अन्यथा शेतकरी संघटना त्यांच्या दारात आंदोलन करील”-नानासाहेब जवरे,प्रसिद्धी प्रमुख शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात मेसर्स कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सन-२०१२ साली स्थापना करण्यात आली होती.या ठिकाणी कंपनी विषारी रासायनिक पदार्थांचे उत्पादन करत आहे.आणि त्याचे सांडपाणी कोपरगाव आणि येवला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नांदेसर,नाटेगाव,बदापूर,पिंपळगाव जलाल,येसगाव,खिर्डी गणेश आदी सहा गावातील नैसर्गिक ओढ्यात सोडून देण्यात येत आहे.परिणामी या ओढ्यातील कंपनीने सोडून दिलेले पाणी नजीकच्या विहिरीत उतरत असून येथील कृषी क्षेत्र धोक्यात आले आहे.शिवाय भूजल दूषित झाले आहे.परिणामी या दूषित पाण्यामुळे नजीकच्या शेत तलावातील मासे मृत झाले असल्याच्या बातम्या या पूर्वीच ‘ न्युजसेवा ‘ या वेब पोर्टलवर मे महिन्यात प्रसिद्ध झाल्या आहेत.हेच पाणी पुढे गोदावरी नदीत प्रवाहित होत असून हेच पाणी जायकवाडी धरणात जात असून पुढील लाखो शेतकऱ्यांना ते कृषी आणि पिण्याचे पाण्यासाठी वापरले जात आहे.शिवाय आगामी काळात सिंहस्थ पर्वणी आली असताना याच पाण्यात भाविक भक्त पवित्र स्नान करणार आहे.त्यात श्री क्षेत्र सरला बेट आणि पुढे नेवासा येथील किसनगिरी महाराज यांचे संस्थान आणि पुढे जायकवाडीचा १०२ टी.एम.सी.चा जायकवाडीचा मोठा जलाशय आहेत्यामुळे मोठा धोका वाढून ठेवला असल्याचे प्रसिद्ध केले होते.  याची गंभीर दखल घेत शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.त्यावेळी त्यांना दिशा दिली होती.त्यानंतर संबंधितांनी जिल्हाधिकारी,येवला तहसीलदार आदींना निवेदने देऊन सदरचे पाणी बंद करण्याची मागणी केली होती.याशिवाय त्याबाबत नाशिक प्रदूषण महामंडळाकडे रीतसर लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्याचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात प्रदूषण महामंडळाने शेतकऱ्यांच्या आरोपाला दुजोरा देऊन शिक्कामोर्तब केले होते.त्यात त्यांनी जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा,१९७४ च्या कलम ३३ ‘अ’ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा,१९८१ च्या कलम ३१ ‘अ’ याचे या मे.कृष्णा एन्झायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उल्लंघन केले असल्याचे उघड-उघड म्हटले होते.मात्र आता प्रदूषण महामंडळ कार्य कारवाई करणार याकडे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन राहिले होते.त्याबाबत नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले असून त्यात हा आदेश दिला आहे.

“सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद स्थितीत आढळला.सर्व प्रक्रिया टाक्यांमध्ये शेवाळ साचलेले दिसले,ज्यावरून हा प्रकल्प दीर्घकाळापासून बंद असल्याचे आणि त्याची योग्य देखभाल केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (इ.टी.पी.) सतत सुरू राहण्यासाठी कोणतीही पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध केली गेलेली नाही.प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी उद्योगाच्या स्वतःच्या मालकीच्या सुमारे ४ एकर शेतजमिनीवर बाहेर सोडलेले आढळले.तुमच्या उद्योगात चार बॉयलर बसवलेले आहेत; मात्र,मंडळाच्या संमती पत्रात केवळ एकाच बॉयलरला परवानगी दिली आहे.परिसराच्या बाहेर दूषित पाणी वाहून गेल्याचे आणि साचल्याचे स्पष्ट पुरावे आढळले आहे.जवळील तलावाच्या पाहणीदरम्यान तलावाच्या काठावर मेलेले मासे आढळून आले,जे जलीय पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दर्शवत आहे.दि.२५ जून २०२६ रोजी दिलेल्या प्रस्तावित निर्देशांचे पालन केलेले नाही”- प्रदूषण महामंडळ,नाशिक विभागीय कार्यालय.

   

  सदर आदेशात प्रदूषण महामंडळाने म्हटले आहे की,”महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल अधिनियम १९७४ चे कलम २६ आणि हवा अधिनियम १९८१ चे कलम २१ तसेच घातक व इतर कचरा (व्यवस्थापन व आंतरसीमा हालचाल) नियम,२०१६ च्या नियम ६ अंतर्गत ठरवून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून तुम्हाला ‘सहमती पत्र’ प्रदान केले होते.आणि ज्याअर्थी,मान्य केलेल्या मानकांनुसार हवा व जलप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी आणि कार्यक्षम प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारणे व आवश्यक उपाययोजना करणे तुमच्यावर बंधनकारक होते.त्याबाबत मंडळाला परिसरातील शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाली होती.तक्रारीची शहानिशा करण्यासाठी उप-प्रादेशिक कार्यालय नाशिक येथील अधिकाऱ्यांनी १४ जुलै २०२६ रोजी तुमच्या उद्योगाची पाहणी केली असता पुढील त्रुटी व उल्लंघन आढळून आल्या आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद स्थितीत आढळला.सर्व प्रक्रिया टाक्यांमध्ये शेवाळ साचलेले दिसले,ज्यावरून हा प्रकल्प दीर्घकाळापासून बंद असल्याचे आणि त्याची योग्य देखभाल केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.वीज पुरवठा खंडित झाल्यास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (इ.टी.पी.) सतत सुरू राहण्यासाठी कोणतीही पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध केली गेलेली नाही.प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी उद्योगाच्या स्वतःच्या मालकीच्या सुमारे ४ एकर शेतजमिनीवर बाहेर सोडलेले आढळले.तुमच्या उद्योगात चार बॉयलर बसवलेले आहेत; मात्र,मंडळाच्या संमती पत्रात केवळ एकाच बॉयलरला परवानगी दिली आहे.परिसराच्या बाहेर दूषित पाणी वाहून गेल्याचे आणि साचल्याचे स्पष्ट पुरावे आढळले आहे.जवळील तलावाच्या पाहणीदरम्यान तलावाच्या काठावर मेलेले मासे आढळून आले,जे जलीय पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दर्शवत आहे.दि.२५ जून २०२६ रोजी दिलेल्या प्रस्तावित निर्देशांचे पालन केलेले नाही.दि.०४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित केलेल्या वैयक्तिक सुनावणीस तुम्ही अनुपस्थित राहिलात.लगतच्या क्षेत्रातून घेतलेले पाण्याचे नमुने मानकांपेक्षा जास्त दूषित आढळले असल्यावर शिक्का मोर्तब करून तुमचे उत्पादन उपक्रम तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.असे न केल्यास,जल अधिनियम १९७४ आणि हवा अधिनियम १९८१ च्या तरतुदींनुसार तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याशिवाय मंडळाकडे कोणताही पर्याय राहणार नाही असे स्पष्ट बजावले आहे.त्यामुळे शेतकरीआणि शेतकरी संघटनेचे म्हणणे खरे ठरले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं असून शेतकरी संघटनेचे अभिनंदन केले आहे.

   दरम्यान याबाबत प्रदूषण महामंडळाचे हा प्रकल्प बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता,महावितरण येवला यांना आणि नांदूर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासन आदींना सदर उद्योगाचा वीज पुरवठा पाणी पुरवठा तातडीने खंडित करण्याचे व या कार्यालयाला तसे कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.मात्र अद्यापही नाशिक जिल्ह्यातील काही राजकीय नेते या कंपनी प्रशासन आणि मालकाला अभय देत असल्याची धक्कादायक माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली असून संबंधित येवला आणि नाशिक जिल्ह्यातील नेते आणि पुढाऱ्यांनी या मर्केट लीला बंद कराव्या अन्यथा शेतकरी संघटना त्यांच्या दारात आंदोलन करील असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close