जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

68.80 लाखांची फसवणूक,आरोपी गजाआड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  राजस्थानमध्ये अधिकृत सरकारी मद्य परवाना मिळून देतो त्यासाठी 68.80 लाख रुपये द्या असे म्हणून फिर्यादी इसम भावेश रामचंद्र थोरात (वय-३५ वर्षे) रा.कर्मवीरनगर,कोपरगांव यांच्याकडून वरील रक्कम लाटून परागंदा झालेल्या अमित सत्यनारायण श्रीवास्तव या आरोपींच्या कोपरगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना राजस्थान या राज्यातून अटक केली आहे.याबाबत पोलिसांचे नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

  

दरम्यान कोपरगाव येथील इसम याचे कमी किमतीत सिमेंट,स्टील देऊन काही उद्योग केले असल्याचे उघडकीस आले आहे.त्यातील एक आरोपीची गाडी यांनी जप्त केली असल्याची माहिती आहे.त्याचे नावांवर संशयास्पद काही कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती.काही दिवसापूर्वी दिल्लीस्थित प्रकरणी काही महिने अटक झाली असल्याची नागरिकांत चर्चा आहे.त्यात त्याला नंतर मुंबईला आणले गेले होते तेथून त्यास जामीन मिळाला असल्याची चर्चा आहे.

   अधिकृत सरकारी मद्य परवाना मिळवणे वर्तमानात अत्यंत कठीण बनले आहे.कारण यामध्ये कायदेशीर प्रक्रिया,कागदपत्रे आणि सरकारी नियमांची मोठी यादी असते.भारतात दारू पिण्यासाठी,बाळगण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना मिळवणे बंधनकारक आहे.त्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रेआवश्यक असतात.ओळखपत्रापासून ते जागेच्या नकाशापर्यंत अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात.त्यासाठी आवश्यक नियम आणि अटी अत्यंत कठीण असतात.शाळा,महाविद्यालये किंवा धार्मिक स्थळांजवळ मद्य विक्रीला परवानगी मिळत नाही.व्यावसायिक परवान्यांसाठी शासकीय शुल्क खूप जास्त असते.सरकारी मंजुरी मिळायला काही आठवडे किंवा महिने आणि काही वर्षे लागू शकतात.त्यामुळे नागरिक किंवा व्यापारी शॉर्ट कट शोधण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येतात.परिणामी या किचकट प्रक्रियेमुळे अनेक जण दलालांचा वापर करताना दिसून येतात.नेमक्या याच गोष्टीचा फायदा काही एजंट घेताना दिसतात.त्यातून अनेक व्यापारी फसण्याची शक्यता असते.परिणामी लाखो रुपयांना चुना लागू शकतो.अशीच एक घटना नुकतीच कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर येथे उघडकीस आली आहे.येथील तरुण भावेश रामचंद्र थोरात हा सन-2021-2022 मध्ये आपल्या काही मित्रासोबत राजस्थान येथे पर्यटनास गेला होता.त्यावेळी त्याची प्रवासात काही राजस्थान येथील अनोळखी प्रवासी मित्रांशी ओळख झाली होती.त्यातून “आपल्याला काही व्यवसाय करायचा आहे”असे त्याने त्या नवपरिचित तरुणांना सांगितले होते.नेमक्या याच संधीचा या धूर्त आणि कावेबाज आरोपी तरुणांनी वापर करावयाचे ठरवले होते.आणि त्यांनी या भावेश थोरात याला राजस्थान मधील सरकारी दारू दुकानाचा परवाना मिळवून देतो असे प्रलोभन (गाजर) दाखवले होते,आणि त्या प्रलोभनाला भावेश थोरात हा अलगत गळाला लावला होता.परिणामी त्याचा विश्वास संपादन करून त्याचे कडून काही रोख तर काही ऑनलाईन अशी विविध वेळी आणि ठिकाणी जवळपास 68.80 लाख रुपयांची रक्कम उकळली होती.यांने सरकारी मद्य परवाना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते.त्यासाठी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता.मात्र रक्कम मिळवलेल्या वरील आरोपी अमित सत्यनारायण श्रीवास्तव व नितु अमित श्रीवास्तव या पतिपत्नी व सह प्रेमलता सत्यनारायण श्रीवास्तव अशा आठ आरोपीं नातेवाकानी थोरात यास नंतर टाळण्यास सुरुवात केली होती.नंतर मात्र भावेश थोरात यास आपण फसवली गेलो आहोत याची खात्री झाल्यावर त्याने कोपरगाव येथील न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती.त्यानंतर न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली होती.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांना गुन्हा दखल करण्याचे आदेश दिले होते.न्यायालयाच्या या आदेशानुसार कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी दि.02 जून 2026 रोजी आपल्या दप्तरी गुन्हा क्र.गु.र.नं.292/2026 भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 420,465,467,468,471,34 प्रमाणे वरील आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

  दरम्यान त्याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी तपास सुरू केला होता.त्यांनी याबाबत राजस्थान येथे जावून नुकतीच प्रमुख आरोपी अमित सत्यनारायण श्रीवास्तव याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे.त्यांना कोपरगाव येथील न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.आता आणखी किती आरोपी यात अटक होणार आणि कधी होणार याकडे कोपरगाव शहरातील नागरिकाने लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close