विशेष दिन
…या महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

माजी राष्ट्रपती,महान तत्त्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसा निमित्त साजरा केला जातो.१९६२ मध्ये डॉ.राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी व चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली.तेव्हा त्यांनी हा दिवस स्वतःचा वाढदिवस न ठेवता “शिक्षक दिन” म्हणून साजरा करावा,अशी इच्छा व्यक्त केली.तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असल्याचे मानले जाते.
भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती,महान तत्त्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसा निमित्त साजरा केला जातो.१९६२ मध्ये डॉ.राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यावर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी व चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली.तेव्हा त्यांनी हा दिवस स्वतःचा वाढदिवस न ठेवता “शिक्षक दिन” म्हणून साजरा करावा,अशी इच्छा व्यक्त केली.तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली.विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या, त्यांच्यात चांगले संस्कार व ज्ञान रुजविणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे.कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय येथे हा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.
सदर प्रसंगी वरिष्ठ वाणिज्य विभागप्रमुख डॉ.अर्जुन भागवत,कला विभाग प्रमुख डॉ.बंडेराव तऱ्हाळ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र हिंगे,पर्यवेक्षक माधव रेवगडे,कलावती देशमुख,शांतीलाल अग्रवाल,अण्णासाहेब गोराणे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुनिता आत्रे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमित्ताने कला,वाणिज्य व विज्ञान विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत अध्यापनाचे काम केले आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे म्हणाले की,“विद्यार्थी म्हणून शिकणे सोपे आहे;परंतु शिक्षक बनून इतरांना शिकवणे कठीण असते.शिक्षक हा देशाची भावी पिढी कर्तव्यदक्ष,सक्षम व संस्कारक्षम करण्याचे उदात्त काम मोठ्या तळमळीने करत असतो” याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी आज घेतला आहे.विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे निमित्ताने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे.शिक्षकांच्या भूमिकेत येवले भूमिका,सोनार साई,पाटील समृद्धी,जामदार तृप्ती,होले निकिता,रोहम श्लोक,प्रियदर्शनी पिंपळे व इतर विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अक्षदा गायकवाड हिने केले तर सूत्रसंचालन अपूर्वा चव्हाण व विद्या सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाक्यवंशिका वाघ हिने मानले आहे.



