धार्मिक
पायी दिंडीस भाविकांचा प्रतिसाद

न्यूजसेवा
संवत्सर (शिवाजी गायकवाड)
आषाढी एकादशीनिमित्त सालाबादप्रमाणे संवत्सर येथील श्री क्षेत्र कमळादेवी मंदीर ते श्री संत जनार्दन स्वामी आश्रम,बेट पायी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे.टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगात तल्लीन झालेल्या सुमारे चारशेहून अधिक भाविकांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला होता.दिंडीचे संवत्सर परिसरात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.

संवत्सर गांवातील रहिवासी कै.भाऊसाहेब कारभारी उगले यांनी गेल्या ३० वर्षापूर्वी या दिंडीची परंपरा सुरु केलेली आहे.ती आजतागायत अव्याहतपणे सुरुच आहे.दरवर्षी दिंडीमध्ये भाविकांची वाढ होत असून भव्य दिव्य स्वरुप दिंडीला प्राप्त झाले आहे.यावर्षी देखील शनिवार दि. २५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी संवत्सर येथील पढेगांव रस्त्यावरील श्री क्षेत्र कमळादेवी मंदिरापासून सकाळी ८ वाजेच्या सुमारास दिंडीस प्रारंभ करण्यात आला होता.पढेगांव चौकी येथे दिंडी पोहोचल्यानंतर लक्ष्मणराव परजणे,दत्तात्रय परजणे,चंद्रकांत लोखंडे,राजेंद्र कापसे,अनिल हिंगे,शिवाजी घेर,विजय भोसले,सुदाम परजणे,वैभव भोसले,प्रभाकर कर्पे यांनी स्वागत करून भाविकांना फराळाचे वाटप केले आहे.तसेच संवत्सर कांदा मार्केट परिसरात कार्यकर्ते मुकुंद काळे,राजेंद्र परजणे,महेश परजणे,विजय काळे यांच्यासह अनेकांनी दिंडीचे स्वागत करून फराळाचे वाटप केले असल्याची माहिती हाती आली आहे.संवत्सर गांवातील श्री शनी महाराज मंदिराजवळ काका गायकवाड,हबीबभाई तांबोळी,चंद्रकांत लोखंडे,सुभाष विडवे,बापू तिरमखे यांनी स्वागत केले.

संवत्सर परिसरातील प्रमुख रस्त्यावरुन दिंडी निघालेली असताना भाविक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते.टाळ मृदूंगाच्या गजराने आणि महिला पुरुष भाविकांच्या अभंगवाणीने सगळा परिसर दुमदुमून गेला होता.संवत्सरला जणूकाही श्री क्षेत्र पंढरीचे स्वरुप प्राप्त झाले होते.कोपरगांव बेटातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात दिंडी पोहोचल्यावर आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज यांनी दिंडीचे स्वागत केले आहे.त्यांनी भाविकांना उपदेशपर मार्गदर्शनही केले.
यंदा पावसाने चांगला दिलासा दिल्याने दिंडीत चैतन्य पसरलेले दिसले.त्यातच गोदावरी नदिलाही महापूर आलेला असल्याने वातावरणात अधिकच प्रसन्नता वाढलेली दिसली.यानिमित्ताने ग्रामस्थांमध्येही उत्साह दिसून आला.ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले त्यावेळी सचिन शेटे,अनिल भाकरे,विजय काळे,चिमाजी दैने,दिनेश बोरनारे,मोहन निकम,अनुप शिंदे, मच्छिंद्र परजणे,यादव दैने,गोकूळ मोर,रविंद्र सोनवणे,हेमंत काळे,लहानू गुंड,ज्ञानेश्वर निरगुडे,नानासाहेब सोनवणे,नाना ढेपले,तसेच भजनी मंडळाचे ह.भ.प.कर्षे महाराज,राजेंद्र कापसे, राजेंद्र भोकरे,वैभव भोसले,शिवाजी घेर,पुंडलीक गिते,संदीप सोनवणे,धिरज कासार,ऋषिकेश वरगुडे यांच्यासह ग्रामस्थ,महिला,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



