धार्मिक
श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलामागे गहन अर्थ -गोरख महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला या केवळ बाललीला नसून त्यामागे गहन आध्यात्मिक,सामाजिक आणि प्रेमाचा संदेश दडलेला आहे.गोकुळातील या लीलांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.गोरख महाराज कुदळ यांनी माहेगाव देशमुख येथे बोलताना केले आहे.

“भगवान विष्णूंनी पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला,तरीही गोकुळात ते एक सामान्य बालक बनून राहिले.परमेश्वर असूनही ते गोपींचे ताक पिण्यासाठी नाचायचे किंवा यशोदा मातेकडून स्वतःला बांधून घ्यायचे.यातून देव केवळ प्रेमाचा भुकेला असतो आणि तिथे अहंकाराला जागा नसते,हे सिद्ध होते- ह.भ.प.गोरख महाराज कुदळ.
महाराष्ट्रामध्ये सात दिवस देवाचे नामस्मरण करून गावोगावी साजरा केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह ही वारकरी संप्रदायाची एक अत्यंत पवित्र आणि जुनी परंपरा आहे.हा सोहळा सलग सात दिवस चालतो.रामनवमी,गोकुळाष्टमी,किंवा कार्तिक व आषाढ वारीसारख्या पवित्र काळात त्याचे आयोजन होते.या काळात पहाटे ५ वा.काकड आरती,सकाळी १० वा.संत ज्ञानेश्वरी पारायण वाचन करण्यात येतात.दुपारी महिला भजन,दुपारी प्रवचन,सांयकाळी हरिपाठ तर सांयकाळी ७ ते ९ अथवा 07 ते १0 या वेळेत कीर्तन केले जाते.यावेळी भागवत धर्माचे आचरण करणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.शेवटच्या दिवशी ग्रंथ -पालखी मिरवणूक काढली जाते.यावेळी विविध देखील टाळ मृदूंगाच्या तालावर पावल्या तर महिला भाविक फुगड्या खेळात आनंदोत्सव साजरा करतात.सकाळी काल्याचे कीर्तन केले जाते यावेळी भगवान श्रीकृष्णच्या विविध लीलांचे वर्णन करण्यात येऊन दही-लाह्यांच्या प्रसाद वाटप करून भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येते.कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथेही ही परंपरा माजी शंकरराव काळे यांचे काळापासून व त्यानंतरही मोठ्या भक्तीभावाने पाळली जात आहे.कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प.गोरखजी महाराज कुदळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी यावेळी माजी आ.अशोक काळे यांसे प्रमुख उपस्थितीसह माहेगाव देशमुख आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढें बोलताना ते म्हणाले की,”भगवान विष्णूंनी पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला,तरीही गोकुळात ते एक सामान्य बालक बनून राहिले.परमेश्वर असूनही ते गोपींचे ताक पिण्यासाठी नाचायचे किंवा यशोदा मातेकडून स्वतःला बांधून घ्यायचे.यातून देव केवळ प्रेमाचा भुकेला असतो आणि तिथे अहंकाराला जागा नसते,हे सिद्ध होते. गोकुळातील गोपी,गोप आणि गाईंचे श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे कोणत्याही स्वार्थाशिवाय होते.यशोदा-नंदांचे वात्सल्य आणि गोपाळांची मैत्री यातून देवाला मित्र किंवा मूल मानूनही भक्ती करता येते,हा सहज मार्ग जगाला मिळाला.श्रीकृष्ण राजघराण्यात जन्माला येऊनही गोकुळात गरिबांच्या,गोपाळांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवायचे त्यामुळे जगाला विश्वस्त प्रेम कसे करायचे याची प्रेरणा मिळाले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.शेवटी त्यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तनाची दहीहंडी फोडण्यात आली आहे.



