संपादकीय
कोपरगावच्या राजकीय आसमंतात होणार बदल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकताच १.७३ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम आ.काळे,राजेश परजणे आणि नितीन औताडे गटांच्या संचालकांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे शुभहस्ते व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.मात्र या कार्यक्रमात माजी आ.कोल्हे आणि बिपीन कोल्हे यांचा अनुपस्थित त्रिकुटावरून जो तिळपापड झाला तो सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.त्यामुळे आगामी काळात कोपरगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहे.त्यामुळे या घटनेच्या पडद्यामागील घटनांवर प्रकाशझोत टिकणे आवश्यक ठरते.

कोपरगाव तालुक्यात असलेल्या जवळके ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीतील चौकात आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून उपबाजार मागत आहे.मात्र त्यांनी तो न दिल्याने या ग्रामपंचायतीने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्याचे पणन संचालक यांचे दरबारी खेचले आहे.त्याची सुनावणी सुरू असून त्याबाबत काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असताना नऊ कि.मी.चे अंतरात याच कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल तीन उपबाजार निर्माण करून मोठा विक्रम केला असल्याचे दिसून येत आहे.
कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीच वर्षापूर्वी संपन्न झालेल्या बिनविरोध निवडणुकीत माजी आ.कोल्हे गटाचे ०८ आ.आशुतोष काळे गटाचे ०६,राजेश परजणे गट व नितीन औताडे गटाचे प्रत्येकी ०२ संचालक बिनविरोध निवडून आले होते.व्यापारी संचालक प्रत्येकी एक दोन्ही प्रमुख गटात सामील आहे.दरम्यान सभापतीपद हे अडीच वर्षांनी खांदेपालट करून आ.काळे गटास देण्याचे निश्चित झाले होते.मात्र ०५ महिन्यापूर्वी कालावधी संपवूनही कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम आपला राजीनामा दिला नाही.अर्थातच यामागे मोठा राजकीय कट असल्याचे मानले जात आहे.स्वाभाविकपणे आ.काळे गटाच्या संचालकांची सभापती पदाची संधी हुकून चालली असल्याचे समजत आहे.त्यामुळे हा वाद उफाळला असल्याचे मूळ कारण असल्याची माहिती आहे.मात्र त्याला आणखी एक कोण समोर आला असून कोपरगाव नगरपरिषदेत आ.आशुतोष काळे गटांची नगराध्यक्षपदाची ओमप्रकाश कोयटेच्या रूपाने संधी थोड्यावरून हुकली आहे.त्यामुळे त्यांची अवस्था ही हातातून कामधेनू गेल्यासारखी झाली आहे.त्यामुळे त्यांच्यात ती राजकीय सल आधीच निर्माण झाली आहे.त्यांनी आपला पराभव मान्य करतानाच चार जागांवर दंड थोपटणाऱ्या शिवसेना (सातभाई) गटाला गाजर दाखवून ठेवले आहे.त्यामुळे सदरचा गट हा कधी ना कधी आपल्या कच्छपी लागणार ही आशा त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याचे दिसून येत आहे.त्यातच त्यांनी सत्ताधारी गटाच्या उपनगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे अपील केलेले आहे.त्यामुळे कितीही नाही म्हटले तरी सत्ताधारी गट अडचणीत आला आहे.त्यामुळे त्यांची वर्तमान अवस्था ही सात इंगळ्या डसल्यासारख्या शेळी सारखी झाली असल्यास नवल नाही.त्यात उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,तीन अपत्यांचा आरोप असलेले नगरसेवक स्वप्नील मंजुळ,तर याशिवाय स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे आदीचा समावेश आहे.त्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर आगामी सुनावणी ०८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.स्वीकृत नगरसेवक सोनल अमोल अजमेरे यांच्या स्वीकृत नगरसेवक पदाने आ.आशुतोष काळे गटाला फारसा फरक पडणारं नाही हे उघड आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा कालखंड संपून जवळपास पाच महिने उलटले आहे.त्यामुळे हे किटाळ दूर करण्यासाठी माजी आ.कोल्हे गट,”जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल असलेले नगरसेवक आपत्रतेबाबतचे अपील आधी परत घ्या” असे म्हणून “मगच आम्ही आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा देतो” असे म्हणून या आयुधांचा वापर करण्याची नामी संधी म्हणून त्याचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हा घोळ वाढत जाणार अशी चिन्हे उघडउघड दिसत आहेत.
दरम्यान त्यातच साधलेला योगायोग म्हणजे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा कालखंड संपून जवळपास पाच महिने उलटले आहे.त्यामुळे हे किटाळ दूर करण्यासाठी माजी आ.कोल्हे गट,”जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल असलेले नगरसेवक आपत्रतेबाबतचे अपील आधी परत घ्या” असे म्हणून “मगच आम्ही आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा देतो” असे म्हणून या आयुधांचा वापर करण्याची नामी संधी म्हणून त्याचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हा घोळ वाढत जाणार अशी चिन्हे उघडउघड दिसत आहेत.

पोहेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत औताडे गटाला उपबाजार हवा आहे.आणि त्यासाठी त्यांनी रांजणगाव देशमुख येथे उपबाजार मंजूर झाल्यानंतर कोल्हे गटाला सारखा तगादा लावला होता.आणि त्याचा तगादा आता कुठे फळाला आला आहे.मात्र फळाला येण्याची जी संधी कोल्हे गटाने साधली त्याला या गटाचा आक्षेप आहे.त्यांनी जो ठराव मागील महिन्यातील २२ मार्च रोजी घेतला म्हणजे तो बाजार समितीत पणन मंत्री जयकुमार रावल ज्या दिवशी येणार त्याआधी केवळ आठवडाभर घेतला आहे.म्हणजे इंग्रजी म्हणी प्रमाणे,”उशिरा मिळालेला न्याय हा;नाकारलेला न्याय असतो” या न्यायाने कोल्हे गटाने त्यांना नाही म्हटले नाही आणि दिलेही नाही अशी (अवघड जागेचे दुखणे) अवस्था औताडे गटाची केली आहे.परिणाम आता समोर आहेच.
दरम्यान या बाजार समितीच्या सभापती रोहोम यांचा राजीनाम्याच्या नाट्यप्रयोगात आणखी एका कोणाची भर पडली आहे तो म्हणजे नितीन औताडे गट.हा विरोधकांच्या गळाला लागला असल्याची शक्यता बळावली आहे.या मागे नेमके काय कारण असावे याचे राजकीय वर्तुळात मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने मागोवा घेतला असता त्यात अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहे.त्या म्हणजे पोहेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत या गटाला उपबाजार हवा आहे.आणि त्यासाठी त्यांनी रांजणगाव देशमुख येथे उपबाजार मंजूर झाल्यानंतर कोल्हे गटाला सारखा तगादा लावला होता.आणि त्याचा तगादा आता कुठे फळाला आला आहे.मात्र फळाला येण्याची जी संधी कोल्हे गटाने साधली त्याला या गटाचा आक्षेप आहे.त्यांनी जो ठराव मागील महिन्यातील २२ मार्च रोजी घेतला म्हणजे तो बाजार समितीत पणन मंत्री जयकुमार रावल ज्या दिवशी येणार त्याआधी केवळ आठवडाभर घेतला आहे.म्हणजे इंग्रजी म्हणी प्रमाणे,”उशिरा मिळालेला न्याय हा;नाकारलेला न्याय असतो” या न्यायाने कोल्हे गटाने त्यांना नाही म्हटले नाही आणि दिलेही नाही अशी (अवघड जागेचे दुखणे) अवस्था औताडे गटाची केली आहे.अर्थातच ही बाब त्या गटाच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते.त्यांनी याबाबत नेमकी मेख ओळखली असल्याचे दिसून येत आहे.परिणामी यांनी कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही येणार असे निरोप असताना त्यांनी ऐन वेळी आपले हुकमी पत्ते काढून कोल्हे गटाला त्यांची जागा दाखवून दिली असल्याचे मानले जात आहे.परिणामी आता कृषी उत्पन्न बाजार समितीत आता माजी आ.कोल्हे गट विरुद्ध आ.आशुतोष काळे,राजेश परजणे आणि त्यांना (आ.काळे गटाशी तीन पिढ्या हाडवैर असलेला) व ऐनवेळी येऊन मिळालेला औताडे गट अशी तीन गटांची महायुती आकाराला आली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.त्यामुळे कोल्हे गट त्यात पुरता फसला गेला असल्याचे दिसून येत आहे.एवढीच गोम नाही तर यात आणखी एक गोम आहे.ती आहे जिल्हा परिषद निवडणुकीची आहे.चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुका संपन्न होणार असे चित्र निर्माण झाले असताना औताडे गटाने आपल्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोल्हे गटाच्या वळचणीला जाणे पसंत केले होते.त्या बदल्यात त्यांनी पोहेगाव जिल्हा परिषद गट आणि त्याच गणांची मागणी करून ती आपल्या पदरात पाडून घेतली असल्याची खात्रीलायक माहिती आहे.मात्र आता गेल्या चार वर्षात समीकरणे मोठया गतीने बदलली आहे.

कोपरगाव तालुक्यात नैऋत्येकडील असलेल्या दुष्काळी १३ गावांच्या पट्ट्यात निळवंडे कालवा कृती समिती सक्रिय असून त्यासह संगमनेर,सिन्नर,राहाता,राहुरी आदी भागात तयार झाला आहे.त्यामुळे अर्थातच औताडे गट आता दुष्काळी जनतेचा (उजनी चारी आंदोलनास याच गटाने ऐनवेळी साथ न दिल्याने) मोठा भ्रमनिरास झाल्याने शेवटचे आचके देत आहे.मात्र हा गट आजही आपले बाहुबल असल्याची बतावणी करून आपल्या पदरात जुन्या मापाने राजकीय दान मागत आहे.त्यामुळे ही बाब कोल्हे गटाला खटकत आहे.त्यामुळे त्यांनी औताडे गटाला आगामी निवडणूक लढवायची असेल तर ती आमच्या (कोल्हे) गटाकडून लढवावी अशी थेट गळ ईशान्यगडाच्या युवराजाने घातली असल्याची माहिती आहे.त्याला औताडे गटाने स्पष्ट शब्दात नकार दिल्याची बातमी आहे.
दरम्यान पोहेगावच्या वर कोपरगाव तालुक्यात नैऋत्येकडील असलेल्या दुष्काळी १३ गावांच्या पट्ट्यात निळवंडे कालवा कृती समिती सक्रिय असून त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या भागातील संगमनेर,सिन्नर,राहाता,राहुरी आदी भागात तयार झाला आहे.त्यामुळे अर्थातच औताडे गट आता दुष्काळी जनतेचा (उजनी चारी आंदोलनास याच गटाने ऐनवेळी साथ न दिल्याने) मोठा भ्रमनिरास झाल्याने शेवटचे आचके देत असल्याचे मानले जात आहे.मात्र हा गट आजही आपले बाहुबल असल्याची बतावणी करून राजकीय मुत्सद्देगिरी वापरून आपल्या पदरात जुन्या मापाने राजकीय दान मागत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ही बाब कोल्हे गटाला खटकत आहे.त्यामुळे त्यांनी औताडे गटाला आगामी निवडणूक लढवायची असेल तर ती आमच्या (कोल्हे) गटाकडून लढवावी अशी थेट गळ ईशान्यगडाच्या युवराजाने घातली असल्याची माहिती आहे.त्याला औताडे गटाने स्पष्ट शब्दात नकार दिला असल्याची माहिती आहे.त्यामुळे त्या गटाची अवस्था ही कोल्ह्यांच्या कळपातून सिंहाने घास काढून न्यावा अशी झाली आहे.त्यातून या दोन्ही गटात मोठी राजकीय दरी निर्माण झाली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे दोन्ही आघाड्यांवर आपली पिछेहाट झाली असल्याचे दिसून येत असल्याने हा गट अस्वस्थ झाला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे या दोन भानगडीमुळे औताडे गट अस्वस्थ दिसून येत असून त्यांची अवस्था ही पिल्लू हरवलेले टिटवीसारखी आहे.त्यातच त्यांना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि त्यांचा भूमीपूजनाचा कार्यक्रम ही संधी निर्माण करून देणारा ठरला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे त्यांनी ऐनवेळी कोल्हे गटाला अंगठा दाखवला असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे हा तडाखा कोल्हे गटाच्या जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान या घटनेने अस्वस्थ होऊन माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी या कार्यक्रमांत थेट मंत्र्यासमोरच,”आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करतो पण ज्यांना निवडून दिले ते आ.आशुतोष काळे हे अनुपस्थित असल्याबाबद खेद व्यक्त करून त्यांनी विधानसभा निवडणुकीत काळे यांना निवडून देऊनही ते अनुपस्थित राहिले मात्र ते सरकारमध्ये काम करत आहेत याची आठवण करून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र त्यांच्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल आभार मानले असल्याची आठवण करून देऊन (स्वतःचे समाधान करून घेत) आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली असल्याचे मानले जात आहे.तर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी तर,”देशात सरकारने पश्चिम आशियात युद्ध सुरू असताना अशा प्रतिकूल परीस्थितीत मतभेद बाजूला ठेवून काम करायला हवे असे सांगून (अनुपस्थित काळे-परजणे,औताडे) विरोधकांवर बोट ठेवले होते.राजकारण तेवढ्यापुरते करायला हवे.माझा फोटो छापला नाही म्हणून कोणी येत नसेल तर अवघड आहे” असे म्हणून जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे,राजेश परजणे यांच्यावर टीका केली होती.(अर्थातच आपली छबी नसली तर एकही फलक या गटाचा लागलेला दिसत नाही हा भाग वेगळा,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे तर कधीच गायब झाली आहे.) नेत्यांची भूमिका कशी असायला हवी असा सवाल उपस्थित करत आपण आपला फोटो लावला नाही तरी कोणावर रुसलो नाही” शेवटी अशी मल्लिनाथी केली आहे.त्यामुळे आगामी काळ कोल्हे गटासाठी आयनीचा ठरणारा असून कोपरगाव तालुक्यातला राजकीय संक्रमण करणारा ठरणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात असलेल्या जवळके ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीतील चौकात आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून उपबाजार मागत आहे.मात्र त्यांनी तो न दिल्याने या ग्रामपंचायतीने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्याचे पणन संचालक यांचे दरबारी खेचले आहे.त्याची सुनावणी सुरू असून त्याबाबत काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असताना नऊ कि.मी.चे अंतरात याच कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल तीन उपबाजार निर्माण करून मोठा विक्रम केला असल्याचे दिसून येत आहे.याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
प्रतिक्रिया-9423 43 9946.



