जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
हवामान विभाग

…या तालुक्यात अवकाळीचा रब्बी पिकांना फटका!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान केले आहे.राहुरी,नेवासा,राहाता,अकोले,नगर आणि पाथर्डी तालुक्यांत काढणीला आलेला गहू,कांदा,मका,द्राक्षे व डाळिंब पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.कोपरगाव तालुक्यात या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.आज अनेक घटना समोर आल्या आहेत.

मौजे चासनळी येथे झालेल्या पावसामुळे व वाऱ्यामुळे भागीनाथ नरहरी धेनक यांचे राहत्या घराची भिंत पडून घराचे नुकसान झाले.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर,वडगाव,चासनळी,वडगाव,बक्तरपूर,वेळापूर,सुरेगाव,रवंदे,मोर्विस,धामोरी,मायगाव देवी,आदी ठिकाणी काढणीला आलेला गहू,मका,कांदा,द्राक्षे आदींचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.

  अवकाळी पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील काढणीला आलेला रब्बी गहू,कांदा,मका आणि हरभरा पिके जमीनदोस्त झाल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्यातच तालुक्यातील फळबागांना फटका असल्याचे समोर येत आहे त्यात पश्चिमेकडील आंबा आणि द्राक्षांच्या बागांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

काल दुपारी 05 वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात माहेगाव देशमुख येथील शेतकरी श्री भरत दाभाडे यांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले आहे.

   अहिल्यानगरसह काही ठिकाणी अवेळी पावसात जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्या तरी कोपरगाव तालुक्यात आज महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार चासनळी येथे भगिनाथ नरहरी धेनक यांच्या राहत्या घराची भिंत पडून त्याचे नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.तर संवत्सर,वडगाव,चासनळी,वडगाव,बक्तरपूर,वेळापूर,सुरेगाव,रवंदे,मोर्विस,धामोरी,मायगाव देवी,आदी ठिकाणी काढणीला आलेला गहू,मका,कांदा,द्राक्षे आदींचे नुकसान झाले असल्याची माहिती हाती आली आहे.या शिवाय मळेगाव थडी,सांगवी भुसार,मढी बुद्रुक,मढी खुर्द,देर्डे चांदवड,देर्डे कोऱ्हाळे,डाऊच बुद्रुक,मंजूर,हंडेवाडी,माहेगाव देशमुख,कान्हेगाव,सडे आदी परिसरात गारांचा पाऊस झाला आहे.त्यातही रब्बी पिकांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.

कोपरगाव तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे झालेले नुकसान दिसत आहे.

   कोपरगाव तालुक्याचे नैऋत्येला दुष्काळी गावात वादळी पाऊस झाला असला तरी अनेकांचे रब्बी पिके निघून गेल्याने त्याचे जास्त नुकसान झाले असल्याचे दिसून आले नाही.मात्र ज्या शेतकऱ्यांचे रब्बी पिके निघाली नाही अशा काही शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.त्यात कोठे जीवित हानी झाली असल्याचे दिसून आले नाही अशी माहिती कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close