दिव्यांग विभाग
आता…या ठिकाणी मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिड हजाराच्यावर दिव्यागांनाआ प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याची आरोग्य विभागाने अखेर दखल घेतली असून यापुढे कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी श्रीरामपूरलाच वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे कोपरगावसह इतर तालुक्याच्या दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“मतदार संघातील सर्वच दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी एकही दिव्यांग व्यक्ती दिव्यांग पत्रापासून वंचित राहणार नाही हा आपला प्रयत्न असून दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक यांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कमीत कमी वेळात मिळवून देण्यात यश मिळाले आहे.यापुढे कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून दिव्यागांना येत्या काही महिन्यात कोपरगावच्या उपजिल्हा रुग्णालयातच वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र,ज्याला सामान्यतः युनिक डिसॅबिलिटी आयडी) कार्ड म्हणून ओळखले जाते,हे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे दिव्यांग व्यक्तींना जारी केले जाणारे एकच,एकीकृत ओळखपत्र आहे.हे कार्ड संपूर्ण भारतात वैध आहे आणि दिव्यांग व्यक्तींना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकमेव पुरावा म्हणून काम करते.या कार्डमुळे दिव्यांगांचा डेटा डिजिटल स्वरूपात साठवला जातो,ज्यामुळे कागदपत्रे सांभाळण्याची गरज उरत नाही.त्यामुळे ते परिणामकारक ठरत आहे.मात्र ते काढण्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मोठी यातायात करून 100 ते 150 कि.मी.पायपिट करून अहिल्यानगर येथे जावे लागत होते.त्यामुळे श्रम आणि वेळ दोन्ही वाया जात होते.त्यासाठी आ.काळे यांनी या नागरिकांसाठी बस सुविधा उपलब्ध करून दिली होती.त्याच बरोबर सदर कार्यालय जवळ व्हावे यासाठी संबंधीत विभागाकडे प्रयत्न सुरू ठेवले होते.त्याला यश आले असून शासनाने सदर तपासणीत ही श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयस्तरावरील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी करून त्यांना वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.त्यामुळे संगमनेर,कोपरगाव, राहाता,अकोले,आदी दिव्यांगांचा वेळ वाचणार आहे.याबाबत या नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेसह आ.काळे यांचे आभार मानले आहे.