जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

..या नेत्याने राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली-माजी आ.काळे

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

   स्व.अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते.त्यांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून त्यांची कार्यशैली महाराष्ट्र सदैव स्मरणात असे प्रतिपादन माजी आ.अशोक काळे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

  

“माझ्यासारख्या विरोधी पक्षातील आमदारांनाही विकासकामांसाठी उदारपणे निधी देणारे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांना आपण जवळून अनुभवले आहेत.माझ्या दोन पंचवार्षिक कार्यकाळात आपण विरोधी पक्षाचा आमदार असतांनाही त्यांनी मतदार संघातील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला.त्यामुळे अनेक ऐतिहासिक विकासकामे मार्गी लागली आहे”-माजी आ.अशोक काळे,कोपरगाव.

    राज्याचे माजी उपमख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या पहिली जयंती निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली आहे.त्यावेळी माजी आ.अशोक काळे यांच्या हस्ते स्व.अजित पवार यांचे प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक राजेंद्र घुमरे,सूर्यभान कोळपे,दिलीप बोरनारे,श्रीराम राजेभोसले,सचिन चांदगुडे,शंकरराव चव्हाण,सुनील मांजरे,मनोज जगझाप,प्रशांत घुले,डॉ.मच्छिंद्र बर्डे,अशोक मवाळ,विष्णू शिंदे,श्रावण आसने,कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महा व्यवस्थापक सुनिल कोल्हे,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबासाहेब सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ तसेच विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,” बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले.आज त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करताना मन सुन्न होते.सामाजिक आणि राजकीय जीवनात तावून-सुलाखून निघालेले अजित पवार यांचेसारखे नेतृत्व घडण्यासाठी अनेक दशके लागतात.राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिव्हाळ्याचे संबंध जपणारे अजित पवार हे अचानक आपल्यातून निघून जातील,अशी कल्पनाही कधी केली नव्हती.त्यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करतांना स्पष्टवक्ते,वक्तशीरपणा,प्रशासनावरील भक्कम पकड आणि विकासाभिमुख निर्णयक्षमता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी ज्या-ज्या पदांवर काम केले,त्या प्रत्येक पदाला न्याय दिला.राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून,यावरून त्यांच्या नेतृत्वाची उंची दिसून येते.आज स्व.पवार हे आपल्यात नसले तरी त्यांनी महाराष्ट्राला दिलेली विकासाची दिशा,सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास आणि विकासकेंद्री राजकारणाचा वारसा कायम प्रेरणादायी राहील अशा शब्दांत माजी आ.काळे यांनी त्यांना शेवटी भावपूर्ण अभिवादन केले.यावेळी कारखाना परिसरात संचालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close